चुरणी येथे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा व केवलराम काळे मित्रपरिवार तसेच प्रकाश साबळे मित्र परिवार च्या वतीने गरजू व गरीब आदिवासी रुग्णांसाठी भव्य आरोग्य शस्त्रक्रिया शिबिर संपन्न..

 


राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सदर महा आरोग्य शिबिरात फोटोचे पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

दि.12/1/25 रोजी ग्रामीण रुग्णालय चूरणी येथे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने महाआरोग्य शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. चुरणी व जवळपासच्या 26 गावातील 2000 गरजू आदिवासी रुग्णांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.



   यामध्ये विविध आजारावरील शस्त्रक्रियेसाठी जवळपास 638 अत्यंत गरजू रुग्ण यांना विविध आजारावरील शस्त्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आले. असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय वर्धा येथे होणार आहे. 

या महाआरोग्य शिबिरामध्ये अंदाजे दहा कोटी रुपयांचे विविध आजारावरील ऑपरेशन विनामूल्य होणार आहे. 

शिबिराचे उद्घाटन  प्रकाश साबळे, युवा सहकारी यशवंत केवलराम काळे, युवा सहकारी उपेन बचले यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.संध्या पजाई, डॉ. अभिषेक जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आदित्य पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ. धुर्वे, राजेश वर्मा जी, डॉ.अलोकार, राहुल तायडे, अनुला खान, ज्ञानेश्वर काळे, सुनील सावळे ,अनिकेत जावरकर, गोपाल महल्ले,अक्षय साबळे ,सौरभ कोहळे, पब्लिक रिलेशन ऑफिसर नाना शिंगणे, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य पाटील व डॉ. धुर्वे यांचा मेघे ग्रुप तर्फे उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अत्यंत गरजू व गरीब आदिवासी रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मनोगत शिबिराचे संयोजक प्रकाश साबळे यांनी व्यक्त केले.



नवनिर्वाचित आमदार केवलराम काळे यांनी निवडून आल्यानंतर गरजू आदिवासी रुग्णांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविण्या संदर्भातील अभिवचन या शिबिराच्या माध्यमातून पूर्ण केल्याची ग्वाही यशवंत केवलराम काळे यांनी आपल्या मनोगततून व्यक्त केली.

युवा नेते ऊपेन बछले यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी वनविभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद प्रशासन, आदिवासी विभाग तसेच आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चिखलदरा यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.



Post a Comment

Previous Post Next Post