नांदेड: माहुर : 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येतो. सदर दिवसी लोकशाही वर निष्ठा ठेवण्याची सर्व मतदार यांना शपथ दिली जाते.
तथापि सदर दिवशी शासकीय सुटी आल्याने निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार आज दिनांक 24.01.2025 रोजी सकाळी 11 वाजता किशोर यादव तहसिलदार माहूर यांनी तहसील कार्यालय माहूर येथील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि तलाठी यांना लोकशाही वर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली.
सदर कार्यक्रमास कैलास जेठे नायब तहसीलदार निवडणुक, राजकुमार राठोड नायब तहसीलदार महसूल आणि तहसील कार्यालय माहूर येथील प्रभू पानोडे, सिद्धार्थ कुलदिपके ,वैभव घोडे, संजय गोडबोले सहायक महसूल अधिकारी तसेच दिपाली पाचपोर, राजु राठोड, वैभव पांढरे, सुरेश सातपुते, सुर्यवंशी हे महसूल सहायक त्याच प्रमाणे रेणुकादास आठवले, यादव तोडसाम, धम्मपाल पाईकराव, मंडपे आदी शिपाई तसेच वाहन विलास शेडमाके,ऑपरेटर प्रकाश शेडमाके उपस्थित होते.