आमोदिनी फाऊंडेशनचा तिसरा वर्धापनदिन जल्लोषात साजरा

 




पुणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या विशेष करून महिलांचे प्रश्न सोडवुन त्यांना समुपदेशन करणा-या पुण्याच्या आमोदिनी फाऊंडेशनचा तिसरा वर्धापनदिन नुकताच जल्लोषात साजरा झाला.सदर कार्यक्रमाची संपुर्ण थीम"महिलांचे मानसिक स्वास्थ्य"ही होती.सदर कार्यक्रमास अतिथी/प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.राणी खेडीकर मॅडम(बालकल्याण समिती अध्यक्षा)उपस्थित होत्या.


कार्यक्रमाची सुरूवात मेहना झुझम यांनी सावित्रीबाईंच्या मनोगताने केली.यावेळी प्रमुख पाहुण्या डाॅ.राणी खेडीकर मॅडम यांचा यथोचित सत्कार आमोदिनींनी शाल आणि साडी नेसवून केला.प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना देहविक्री करणा-या स्त्रिया आणि त्यांची मुले यांची सत्यपरिस्थिती,त्यांना येणा-या अडचणी त्यासाठी राणी ताई करत असलेले कार्य,अशा मुलांकडे आपण समाजाने बघायचा दृष्टीकोन बदलणे कसे आवश्यक आहे,त्याची गरज आणि अशा स्त्रियांना ख-या अर्थाने सक्षम करून त्यांचे मनस्वास्थ टिकविण्यासाठी काय करता येईल याविषयीची माहिती दिली.राणी ताईंनी दिलेल्या भावनिक सादेमुळे सर्व आमोदिनींना अगदी हेलावून टाकले होते.सदर कार्यक्रमास एमआयटी लाॅ काॅलेजच्या डीन डाॅ.सपना देव उपस्थित होत्या.तसेच जेष्ठ वकील माधवी पोतदार,एडवोकेट सुनिता बंसल इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

    या कार्यक्रमांमध्येच कष्टकरी मावशी यांचा सन्मान त्यांना दैनंदिन जीवनात लागणा-या वस्तू म्हणजेच स्टील डबा आणि पिशवी देऊन आनंदाने करण्यात आला.तसेच मेहना या आमोदिनीने कष्टकरी मावशींना ओवाळले.तसेच सर्वांना हळदीकुंकू देऊन वाण देण्यात आले.सदरचे वाण व गिफ्ट आमोदिनी प्रीती शिंगवी आणि सौ.अश्विनी यांनी दिले.सदर कार्यक्रमानंतर बोलताना उपस्थित अनेक महिलांनी आमोदिनी फाउंडेशनचे कौतुक केले.तसेच आम्हाला मोलाचे मार्गदर्शन मिळाले आणि आम्हीही तुमच्या कार्यात सहभागी होऊ असे आश्वासन दिले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमोदिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा एडवोकेट अनिशा फणसळकर,उपाध्यक्षा रश्मी जोशी,सचिव एडवोकेट संध्या बागुल,खजिनदार एडवोकेट नीलिमा चव्हाण तसेच टीम आमोदिनी माधवी,अश्विनी ,चिरंजीवी,चित्रा,मोना,मेघना,प्रीती,पल्लवी ताई,अनिता,कल्पना,मृणाल ,यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एडवोकेट अश्विनी कळंबकर यांनी उत्कृष्टपणे पार पाडले.आणि व्हीडीओ शुट महाराष्ट्र 24तासच्या मुख्य संपादक अमिता कदम यांनी केले.कार्यक्रमाची सांगता सुस्वाद अशा अल्पोपहाराने झाली.सदर अल्पोपहार आमोदिनी रश्मी जोशी यांनी दिला होता.पुर्ण कार्यक्रम अत्यंत दिमाखात पार पडला.



Post a Comment

Previous Post Next Post