जिल्हा प्रतिनिधी :- पवन पाटणकर
अमरावती - स्थानिक शिराळा येथील शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात हिंदुहदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन व हारअर्पण शिवसेना अमरावती तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ यांच्या हस्ते करण्यात आले. व त्यानंतर सर्व शिवसैनिकांनी फोटोचे पूजन व वंदन केले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय,व वंदनीय हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर एक वेगळा उपक्रम म्हणून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बुक व पेनाचे वाटप करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित शिवसैनिकांमध्ये अमरावती तालुका प्रमुख मंगेश काळमेघ,निलेश कुकडे ,शिराळा शिवसेना शाखाप्रमुख वैभव मुंदाणे, मीडिया प्रमुख रितेश देशमुख,पवन पाटणकर,साहिल राणे,सार्थक टोम्पे, तेजस टोम्पे, आशुतोष देशमुख, सौरभ देशमुख, अमर ताजने, राहुल टोम्पे, जय देशमुख, ओम देशमुख, स्वप्निल देशमुख, समीर देशमुख, ऋषिकेश देशमुख, राहुल देशमुख, सागर टोम्पे, सुशील देशमुख, संतोष यावले, निखिल दहापुते, बबलू मिसार, संकेत जिभकाटे, रमेश देशमुख, विजय देशमुख, अर्पित नवरंगे, स्वप्निल जीभकाटे, अनुप पटले, भूषण पाटणकर, कैलास मानकर, आशिष वडे, संदीप तुळे , अक्षय कावरे, प्रफुल कडू, कुंदन राऊत, शुभम वाडेकर, आशिष बांबल, रितेश घुरडे, राजेश कुकडे, भूषण पटले, दिनेश पटले, प्रवीण राऊत, स्वराज मानकर, दुर्गेश मानकर, सतीश मानकर व इतर शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.