माहूर नगरपंचायत ला दोन सुवर्ण तर दोन रोप्य पदक

 


नगरपंचायत कर निर्धारक पदावर कार्यरत असताना कुमारी स्वाती गुव्हाडे हिने घेतला विभागीय स्पर्धेत सहभाग 


नगराध्यक्ष मुख्याधिकार्यासह कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी केला हृदय सत्कार

विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

श्रीक्षेत्र माहूर  :  महाराष्ट्र शासनाचे नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभाग मुंबई यांचे कडून आयोजित विभागीय स्तरावर पारपडलेल्या क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजी नगर विभागातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या क्रीडा स्पर्धेत माहूर नगर पंचायत कडून प्रतिनिधित्व करताना नगरपंचायत माहूर येथे करनिर्धारक व प्रशासकीय सेवा या पदावर कार्यरत असलेल्या स्वाती बबनराव गुव्हाडे यांनी 

3 की.मी. वॉकिंग स्पर्धेत सुवर्णपदक, समुह गित गायन स्पर्धेत सुवर्ण पदक, थाळी फेक स्पर्धेत रौप्य पदक तर गोळा फेक स्पर्धेत रौप्यपदक असे एकूण 4 पदके मिळवत माहूर नगर पंचायत चे नाव विभागीय स्तरावर चमकवले आहे.


या नेत्रदीपक कामगिरी बद्दल नगरपंचायत माहूर येथे सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात नगराध्यक्ष फीरोज भैय्या दोसाणी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, मुख्याधिकारी विवेकजी कांदे व कार्यालय अधिक्षक तथा लेखापाल वैजनाथ स्वामी यांचेसह सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या यशाबद्दल स्वाती गुव्हाडे यांचा हृदय सत्कार अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



 यावेळी बोलतांना नगराध्यक्ष फीरोज दोसाणी म्हणाले असेच माहूर नगर पंचायत च्या वतीने कर्मचारी यांनी वेळोवेळी होणाऱ्या विविध खेळामध्ये यश संपादन करुन माहूर नगर पंचायत चे नाव उज्वल करावे असे आवाहन करतो.शेवटी या सत्काराला उत्तर देताना स्वाती गुव्हाडे यांनी मनोगतात केलेल्या सन्मान आणि सत्काराबद्दल आभार मानले. यावेळी मान्यवरासह लेखापाल व लेखापरीक्षक विशाल मरेवाड,स.कार्यालय अधिक्षक संदिप गजलवाड, इंजिनिअर विशाल ढोरे,स.प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे,शहर समन्वयक शेख मजहर, गुंठेवारी विभागाचे विजय शिंदे, स्वच्छता विभाग प्रमुख गणेश जाधव,पाणी पट्टी वसुली प्रमुख कल्याण पाटील, मालमत्ता कर विभाग प्रमुख सुरेंद्र पांडे,शेख नयुम, विलास बोरकर,अवि बरडे, समाधान,सादिकभाई,प्रविन शेंडे,ज्योती नलावडे,शकीलाबी व ईतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post