सहाय्यक जिल्हाधिकारी मा कावली मेघना यांच्या निर्देशावरून मतदार दिनाचा कार्यक्रम साजरा..



विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

नांदेड  : मेघना कावली,भा. प्र. से. सहायक जिल्हाधिकारी किनवट यांचे निर्देशानुसार व किशोर यादव तहसीलदार माहूर यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता  तहसील कार्यालय माहूर च्या वतीने श्री रेणुका महाविद्यालय माहूर येथे राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.



         या वेळी संजय खडकेकर, गट समन्वयक तथा पर्यवेक्षक यांनी  महाविद्यालयाच्या नवमतदार विद्यार्थ्यांंना लोकशाहीवर निष्ठा ठेवणे विषयक शपथ दिली.  

सदर कार्यक्रमाचे प्रभू पानोडे सहायक महसूल अधिकारी आणि प्रकाश शेडमाके तांत्रिक सहाय्यक यांनी नियोजन केले.  

या कार्यक्रमास प्राचार्य टी.एम. गुरूनुले, कृष्णा भराडीया गट शिक्षणाधिकारी माहूर, प्राध्यापक नीलेश पाटील,  प्राध्यापक कांडलीकर, कैलास जेठे नायब तहसीलदार निवडणुक माहूर यांचे सह समस्त प्राध्यापक  आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post