नगरसेविका पती राजू सौंदलकर यांनी केले स्वागत
जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
श्रीक्षेत्र माहूर : माहूर गडावर असलेली देवस्थाने तथा किल्ला पांडवलेणी सह सोनापीर दर्गा यासह अनेक ऐतिहासिक पौराणिक स्थळे असल्याने नेहमीच येथे विदेशी पर्यटक येत असतात दिनांक 24 रोजी पोलॅड येथून पती-पत्नी मोटरसायकल द्वारे महाराष्ट्र पर्यटन भ्रमण अंतर्गत माहूर येथे पोहोचले श्री रेणुका देवी संस्थान येथे नगरसेविकापती राजू सौंदलकर आणि व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
माहूर तालुक्यात पौराणिक ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात असून पर्यटकांना ट्रेकर्सना आकर्षित करण्यासाठी येथे किल्ला असून किल्ल्यातही मस्जिद दर्गा मंदीर असल्याने आलेले पर्यटक सोनापिर बाबा दर्गा व किल्ल्यात भ्रमंतीसाठी येत असतात तसेच अनेक उंच टेकडे असल्याने ट्रेकर्सही मोठ्या प्रमाणात घेऊन आपली हौस थोडक्यात भागवून घेतात येथे त्या प्रमाणात पर्यटक ट्रॅकर साठी सुविधा नसल्याने पर्यटकांची संख्या सध्या कमी आहे
बऱ्याच दिवसानंतर पर्यटनासाठी विदेशी पाहुणे असल्याने त्यांना पाहण्यासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी जमली होती पोलॅड येथील पती-पत्नी जोडप्याने मुंबई येथून यामा कंपनीची मोटर सायकल भाड्याने घेत संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यटन करणार असल्याने पुढील प्रवासासाठी त्यांना जमलेल्या नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.