राज्य स्तरीय निर्भिड पत्रकार म्हणून अर्जुन जाधव यांची निवड

 




मुंबई - निर्भिड जश्यास तसी बातमी प्रकाशित करून समाजास न्याय मिळवून देणारे दंडाधिकार या वर्तमान पेपरचे संपादक तथा डीएनएल न्युज चॅनलचे मालक अर्जुन डी जाधव यांना या वर्षीचा ठाणे येथून जन जागृती सेवा संस्था यांच्या वत्तीने जाहीर करण्यात आला आहे.

जन जागृती सेवा संस्था ही संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांचे हित संबंध जपत पत्रकारा वर होणारे अन्याय अत्याचार या विरोधात लढा देत न्याय मिळवून देते. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात गेल्या पंच्चे विसवर्षा पासून सतत निर्भिड लिखान करत गरीबावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याच अधिकाऱ्यांना न सोडणारे तथा दहावर्षा खाली एका राजकीय नेत्याचे कतृत्व पेपर च्या माध्यमातून लिखान करून जनते समोर वाचन करण्यास दिले होते त्याचा राग धरून पोलिस प्रशासन व तहसिल प्रशासन यांनी संगनमत करून साधे १०७ ची केस करून त्यांना सात दिवस जेलची हवा भोगावयास लावली असे दंडाधिकार या वृत्त पत्राचे संपादक तथा डीएनएल न्युज चॅनल चे मालक अर्जुन डी जाधव यांना या वर्षाचा पत्रकारीतेत निर्भिड लिखान करणारे संपादक म्हणून त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे.

 हे पुरस्कार मार्च महिण्यात सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहिर होता मानवी हक्क अभियान संघटनेच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post