गाव सहेली, रूपाली पाचघरे
नेरपिंगळाई : स्थानिक जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा ही आदर्श शाळा असून या शाळेतील शिक्षिका निरावंती वाठ या दिनांक 23 मे 2023 रोजी या शाळेत रुजू झाल्या आणि दोन वर्षातच त्यांची बदली होऊ घातली आहे. परंतु शासन आदेशानुसार आदर्श शाळेतील शिक्षिकेची बदली पाच वर्षापर्यंत होणार नाही. असे आदेश असताना आणि शिक्षिका वाठ यांनी बदली संदर्भात कोणताही विनंती अर्ज केला नसताना सुद्धा त्यांची बदली होत आहे.
या विद्यार्थी प्रिय शिक्षिका असून वाठ शिक्षिका येथे रुजू झाल्यापासून येथील शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. निरावंती वाठ शिक्षिका यांनी याआधी सहा वर्षे मेळघाटात सेवा दिली आहे. आणि आता पुन्हा त्यांची बदली धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नांदुरी या गावात होऊ घातली आहे. शिक्षिकाची बदली रद्द व्हावी. म्हणून शालेय व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी सीईओ यांना निवेदन देऊन बदली रद्द करण्याची विनंती केली आहे.