तहसीलदार किशोर यादव यांनी नऊ महिन्यात 30 गाड्या पकडून केली धडक कारवाई ; तब्बल 15 लाखाचा दंड वसूल..
अबब 9 महिन्यात तब्बल 30 वाहने पकडली
जप्त वाहने जप्त वाळू मधून तहसीलदारांनी उभा केला तब्बल 50 लाखाचा महसूल
गोरगरिबासाठीच जप्त वाळूचा लिलाव जप्त वाळू हराशी घेणाऱ्यांनी गरिबांना कमी दरात वाळू देण्याचे तहसीलदारांचे आवाहन
श्री क्षेत्र माहूर
विशेष प्रतिनिधी/ अनिल बंगाळे
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव यांनी नऊ महिन्यांमध्ये धडाकेबाज कारवाया करत वाळू चोरी करणारी तब्बल 30 वाहने जप्त करून त्या माध्यमातून 15 लाखाचा दंड वसूल केला असून यामुळे वाळू चोरी मात्र शून्यावर आली असताना आणखी पंधरा वाहनाकडून 15 ते 20 लाख रुपये दंड वसूल करत जप्त वाळू साठ्याच्या हराशीतून वीस लाख रुपये महसूल जमा करून एकूण 50 लाख रुपये शासन दरबारी जमा करत असल्याची जिल्ह्यात विक्रमी कारवाही केल्याने तहसीलदारांच्या या धाडसी कारवाईचे अभिनंदन होत आहे.
शासनाकडून वाळू घाटांच्या हराशींचे कार्य विचाराधीन असून यामुळे मात्र घरकुल धारक व गोरगरिबांना स्वस्त वाळू मिळणे दुरापास्त झाले होते त्यामुळे तहसीलदार किशोर यादव यांनी वाळू तस्करांनी नदीपत्रावर वाळू चोरीच्या उद्देशाने जमा केलेल्या वाळूची जप्ती करून या जप्त वाळूचा गोरगरिबांना फायदा व्हावा यासाठी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्याकडे प्रस्ताव पाठवले होते गोरगरीब तथा घरकुलधारकांचा विचार करून सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी तात्काळ लिलाव जाहीर करून दिनांक सहा रोजी जप्ती घेणाऱ्यांना वाळूचे लिलावात बोली मंजूर करून त्यांना स्वस्त दरात गोरगरिबांना वाळू विक्री करण्याचे आदेश दिले असून लवकरच खालील नऊ घाटावर गोरगरिबांना स्वस्त वाळू मिळणार आहे.
माहूर तालुक्यातील हिंगणी 35 ब्रास टाकळी 60 ब्रास पडसा 110 ब्रास सायफळ 55 ब्रास वडसा 50 ब्रास नेर 65 ब्रास पडसा 41 ब्रास दिघडी धा. 30 ब्रास सायफळ 12 ब्रास वडसा 25 ब्रास कोळी 39 ब्रास यावा ग वाळू घाटावरील जप्त वाळू चा लिलाव झाला असून लवकरच या बोलीत लीलाव घेणाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी नदी पात्रावर असलेल्या वाळू साठे घेणाऱ्याशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या ताठर भूमिकेमुळे तहसीलदार किशोर यादव तथा महाकाल तथा उर्फ नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी वाळू चोरांची वाहने पकडण्याचा सपाटा लावत धुमाकूळ घातल्याने वाळू तस्करी 100% बंद झाली असून यामुळे मात्र नागरिकांना वाळू मिळणे दुरापास्त झाले होते.
त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी दिनांक एक रोजी पासून ते अकरा पर्यंत मौजे लिंबायत शिवरात 160 ब्रास जप्त वाळूचा लिलाव प्रवीण चोले यांना दिला यामुळे नागरिकांना सहजपणे वाळू मिळाली सोबतच दिनांक 6 रोजी तालुक्यात नऊ ठिकाणी वाळू साठे हराशीमुळे नागरिकांना आता आणखी स्वस्त वाळू मिळणार आहे. असून नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधून वाळू उपलब्ध करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले असून त्यांनी जप्त केलेल्या वाहनातून सुमारे 50 लाख रुपये महसूल शासन दरबारी जमा होणार असल्याने त्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाई मुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.