मागेल त्याला टँकरने मोफत पाणी वाटप


भाजपाचे नगरसेवक गोपु महामुने यांचा स्तुत्य उपक्रम


गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो 9421367593


तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या माहूर शहरात दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच माहूर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचीही शहरात सतत वर्दळ असते. दरवर्षी उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना “जय जंगो रायताड प्रतिष्ठान”च्या माध्यमातून राबविण्यात येणारा “मागेल त्याला मोफत पाणी टँकर” हा उपक्रम नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे.

आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने यांनी हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला असून, मागील तीन वर्षांपासून तो अखंडपणे सुरू आहे. शहरातील विविध भागांमध्ये दररोज सुमारे २० ते २५ घरांना मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम तसेच इतर आवश्यक प्रसंगीही नागरिकांना तात्काळ टँकर सेवा उपलब्ध करून दिली जाते.

यासोबतच माहूर बस स्थानकासमोर थंडगार आर ओ फिल्टरचे शुद्ध पाणी सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामीण भागातून येणारे नागरिक, प्रवासी तसेच दर्शनासाठी येणारे भाविक यांना या सुविधेचा मोठा लाभ होत असून, उन्हाळ्याच्या दिवसांत ही सेवा अनेकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

या उपक्रमाविषयी गोपू महामुने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मीसुद्धा या शहराचा एक नागरिक आहे. या शहराने मला खूप काही दिले असून, या शहराचे काही उपकार फेडण्याची भावना माझ्या मनात आहे. अशा पवित्र देवस्थानच्या ठिकाणी राहण्याचे मी माझे भाग्य समजतो. समाजासाठी काहीतरी उपयोगी कार्य करावे या भावनेतूनच मी ही मोफत सेवा सुरू केली आहे.

 या उपक्रमामागे कोणताही स्वार्थ नसून समाजाचे काही देणे लागतो एवढीच भावना मनात आहे.गोपू महामुने यांच्या या समाजाभिमुख कार्यात सहकारी निलेश तायडे यांचेही मोलाचे योगदान असून, त्यांच्या सहकार्यामुळे ही सेवा सुरळीतपणे सुरू आहे. गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समानतेने मदत केली जात असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे.

माहूरसारख्या धार्मिक आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून, नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post