शिराळा येथे शेती दिनाचे आयोजन


            जिल्हा प्रतिनिधी / पवन पाटणकर

 अमरावती: शिराळा येथे कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी अमरावती, श्री संत उदाशी महाराज विश्वस्त व कृषी अग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमाने " कृषी विभाग आपल्या दारी " कार्यक्रमां अंतर्गत शेती दिन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित ॲड, अरविंद देशमुख, सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सुभाष देशमुख, प्रा. गजानन मदने, प्रगतशील शेतकरी विजयराव देशमुख, कृषी पर्यवेक्षक भूषण देशमुख, कृषी ॲग्रोवन जिल्हा प्रतिनिधी सचिन शेगोकर, मंडळ कृषी अधिकारी निता कवाने, विश्वस्त ज्ञानेश्वर कोहळे, अरुण शेलोरकर, स्वप्निल आंबुलकर, उपस्थित होते.



 सर्वप्रथम कृषी कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मार्गदर्शक डॉ. सुभाष देशमुख यांनी सोयाबीन व कापूस सुधारित तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. तर प्रा. गजानन मदने यांनी तूर व हरभरा पिकाची लागवड रुंद सरी वरंबा पद्धतीने करावी. तसेच ढगाळ वातावरणात तुर, हरभरा पिकाचे व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. यावेळी नीता कवाने यांनी कृषी व कृषी संलग्न योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी सचिन शेगोकार यांनी ॲग्रोवन मध्ये येणारे शेती व शेती पूरक नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करून त्याचा उपयोग आपल्या शेतीत करावे, असे सांगून ऍग्रोवनचे सतत वाचन करण्याचे आवाहन केले.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक मारोती जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन महारुद्र संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवाशक्ती ग्राम विकास संघटन चे अमरावती जिल्हा सचिव आकाश शेंडे यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये पत्रकार तथा युवाशक्ती ग्राम विकास संघटनचे अमरावती उपजिल्हाप्रमुख पवन पाटणकर, राजेश भोवाळू, गोपाल कोहळे, रामराव दहापुते, देवराव बावनकुळे, ज्येष्ठ पत्रकार डी. आर. वानखडे, आशिष उके, साहिल राणे, तसेच शिराळा गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी व महिला वर्ग उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post