गौरखेडा कुंभी येथील ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी मुंग गिळून गप्प !!
गावातील लोकांची भ्रष्टाचारा बाबतीत ओरड !!गाव विकास कामांसाठी मिळणारा निधी गिळला सांबावि अभियंता व कंत्राटदारांनी !!
गावाकडची बातमी, स्थानिक प्रतिनिधी संतोष भालेराव
अचलपूर : गौरखेडा कुंभी येथील सिमेंट रस्ता बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचे वृत्त गावाकडची बातमी ने प्रकाशित करताच रस्त्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी घेतली आहे.
याबाबत गोरखेडा कुंभी येथील नागरिकांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या बांधकाम ठेकेदाराचे देयक थांबवावे, तसेच सदर कंत्राटदाराची अनुज्ञप्ती अशी मागणी स्थानिक युवा कार्यकर्ते नितीन शिंदे यांच्यासह नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. आमदार निधीमधून
साबांविच्या वरिष्ठांकडे तक्रार...
■ जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास
२५/१५ या हेड खाली सदर रस्त्याचे बांधकाम झाले असून त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. नरसरी ते हनुमान मंदिरपर्यंत आणि पॅनेशिया ते पाण्याची टाकीपर्यंत दोन्ही रस्त्याचे सिमेंट बांधकाम करण्यात आले आहे. सदर रस्ते बांधकामात करताना बांधकामाची माहिती देणारा फलक जाणीवपूर्वक लावण्यात आले नाही. या रस्ता बांधकामाची माहिती जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग
अचलपूरला माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागण्यात आलीः मात्र अद्यापपर्यंत शिंदे यांना माहिती पुरविण्यात आली नाही.
त्यामुळे सदर रस्त्याच्या बांधकामावर किती निधी प्राप्त झाला, पैकी किती खर्च करण्यात करण्यात आला, रस्त्याचे प्राकलन,रस्त्याची लांबी, रुंदी आणि जाडी तसेच बांधकाम विभागाने घेतलेले रस्त्याचे मोजमाप याबाबत काहीच माहिती नाही. उल्लेखनीय म्हणजे सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यावर काही दिवसातच रस्त्याला फार मोठे जागोजागी तडे गेले आहे..
आणि सायकलचे चाक फसून फार मोठे अपघात होण्याचा संभव असल्याने वाहनचालकांना डोळ्यात तेल घालून आणि मोठी कसरत करून वाहने चालवावे लागतात.
या ठिकाणी काही किरकोळ अपघातदेखील झाले आहेत.
अनेक ठिकाणी रस्त्यावरील सिमेंटची धूळ उडू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून त्याचे काहीच फलीत झाले नसून उलट या रस्त्यामुळे अपघाताची शक्यता बळवली आहे.
त्यामुळे सदर रस्त्याचे सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत रस्ता बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचे देयक काढू नये, सदर ठेकेदाराची अनुज्ञप्ती रद्द करावी आणि रस्त्याचं कामं चालू असलेल्या जागी खर्चाबाबत फलक लावावा, अशी मागणी नितीन शिंदे यांनी केली आहे. या रस्त्याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल, अशी आश्वासन याप्रसंगी कार्यकारी अभियंता यांनी दिलं आहे..