मौजे वानोळा (बाजार) ता. माहूर जि. नांदेड येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक कार्यान्वीत करण्यात यावी.अमित राठोड यांची मागणी
गावाकडची बातमी विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
नांदेड, माहुर : मौजे वानोळा (बाजार) ही मोठी बाजारपेठ आहे.
या बाजारपेठे अंतर्गत ३० ते ३५ गावे येतात. वानोळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा व महाविद्यात्र्य आहे व परिसरातील गावात सुध्दा शाळा आहे.
या गावात यापूर्वी बँकेचे कामकाज चालत होते. काही वर्षापूर्वी ती किनवट येथे स्थलांतरीत झाली आहे.
यामुळे : 👉🏻 १) वयोवृध्द नागरीकांन खुप त्रास होत आहे.
👉🏻 २) सरकारी कर्मचारी यांचे पगार व इतर आर्थिक बाबत अडचणी निमाण होत आहे.
👉🏻 ३) लाडक्या बहिणींना आर्थिक व्यवहाराकरीता वानोळा व परिसरात बँकेची सोय नाही .. 👉🏻 (४) शेतकरी बांधवांना पिक कर्जाची खुप अडचण निर्माण होत आहे.
वानोळा पासून ३० कि.मी. पर्यंत कोणत्याही बँकेची सोय नाही. तरी या भागात महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा कार्यान्वीत करण्याकरीता आदेश द्यावेत..
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमित दतराम राठोड यांनी निवेदनाव्दारे केली आहे..