संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार - सकल मराठा समाज किनवट

 


गावाकडची बातमी विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 


किनवट  : मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यासह मुख्य सूत्रधाराच्या शोध घेऊन  तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी किनवट  यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.

    1 डिसेंबर 2024 रोजी मसाजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूर व निर्दयी पणे हत्या करणाऱ्या सर्व आरोपीस तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी किनवट यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना करण्यात आली. या निवेदनावर सुरेश सोळंके पाटील, सचिन कदम पाटील, आकाश इंगोले, अजय कदम पाटील, संतोष डोंनगे,  विक्रम पवार, वैभव हजबे,  बबन वानखेडे, बाळासाहेब यादव, दत्ता नरवाडे, बालाजी आंकडे,  नंदकिशोर जामगे, उमाकांत कराळे, सुमित माने, शिवा पवार, संदीप कदम, कृष्णा वरुडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post