गौरखेडा कुंभी येथील रस्ते कामात करोडो रुपयांची उधळपट्टी !!

 



गावाकडची बातमी स्थानिक प्रतिनिधी संतोष भालेराव 

अचलपूर,परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत गौरखेडा कुंभी गावातील सिमेंट रस्ता बांधकामात प्रचंड भ्रष्टांचार झाला असल्याची तक्रार करण्यात आली असून यासाठी जबाबदार असलेल्या बांधकाम ठेकेदाराचे देयक थांबवावे, अशी मागणी स्थानिक युवा कार्यकर्ते नितीन शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आमदार निधीमधून २५/१५ याहेड खाली सदर रस्त्याचे बांधकाम झाले असून त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. नरसरी ते हनुमान मंदिरापर्यंत आणि पॅनेशिया ते पाण्याची टाकीपर्यंत दोन्ही रस्त्याचे सिमेंट बांधकाम करण्यात आले आहे.


सदर रस्ते बांधकामात करताना बांधकामाची माहिती देणारा फलक जाणीवपूर्वक लावण्यात आले नाही. या रस्ता बांधकामाची माहिती जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अचलपूरला माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत शिंदे यांना माहिती पुरविण्यात आली नाही.



त्यामुळे सदर रस्त्याच्या बांधकामावर किती निधी प्राप्त झाला, पैकी किती खर्च करण्यात आला, रस्त्याचे प्राकलन, रस्त्याची लांबी, रुंदी आणि जाडी तसेच बांधकाम विभागाने घेतलेले रस्त्याचे मोजमाप याबाबत काहीच माहिती नाही. उल्लेखनीय म्हणजे सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यावर काही दिवसातच रस्त्याला फार मोठे जागोजागी तडे गेले आहे. त्यामध्ये दुचाकी आणि सायकलचे चाक फसून फार मोठे अपघात होण्याचा संभव असल्याने वाहनचालकांना डोळ्यात तेल घालून आणि मोठी कसरत करून वाहने चालवावे लागतात.


या ठिकाणी काही किरकोळ अपघातदेखील झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील सिमेंटची धूळ उडू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून त्याचे काहीच फलीत झाले नसून उलट या रस्त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत रस्ता बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचे देयक काढू नये, अशी मागणी नितीन शिंदे यांनी केली आहे गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वच रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय निधीतून गौडबंगाल केले आहे अशी ओरड गावातील लोक करत आहेत ज्या ज्या वार्डातील कामेही निकृष्ट दर्जाची झाली आहेत तेथील ग्रामपंचायत सदस्य सुद्धा मुग गिळून चिडीचूप बसले आहेत त्यांच्या अशा वागण्यामुळे गावातील नागरिकांना आश्चर्य वाटतं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post