नाशिक(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)समाजसेवेची आवड,जमेल त्याला जमेल तशी मदत करणे हा सौ.सुनिता गांगुर्डे यांचा स्वभाव.सौ.सुनिता गांगुर्डे या मराठा क्रांती मोर्चा नाशिक जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.छत्रपती सेना,सकल मराठा समाज नाशिक याठिकाणी ही त्यांचे कार्य चालु आहे.त्यांच्या या चतुरस्त्र,सर्व समावेशक समाज उपयोगी सामाजिक कार्याची दखल नाशिक येथील ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.आशाताई पाटील यांनी घेतली.नुकताच सुनिता गांगुर्डे यांना नाशिक येथील सॅलिब्रिटा हाॅटेल मध्ये प्रतिथयश,आदरणीय सन्मानिय प्रतिभावंतांच्या हस्ते"महाराष्ट्र समाज गौरव पुरस्कार वर्धापनदिन "समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
सुनिता गांगुर्डे या अनाथाश्रम,वृध्दाश्रम,बालकाश्रम येथे जाऊन त्यांना अन्नदान,खाऊ वाटप,कपडे वाटप,जीवनावश्यक वस्तूचे वाटप करत असतात.कोरोना काळातही त्यांनी गरजवंतांना,निराधारांना मदत केलेली.वेगवेगळ्या संस्थांनी सुनिता गांगुर्डे यांना विविध पुरस्कारांनी गौरवांकीत केले आहे.ग्राहक रक्षक समिती च्या राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.सौ.आशाताई पाटील यांच्या संकल्पनेतून वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सुनिता गांगुर्डे यांनी ग्राहक रक्षक समिती च्या राष्ट्रीय अध्यक्षा डाॅ.आशाताई पाटील यांचे आभार मानले.समाजसेविका सौ.सुनिता गांगुर्डे यांना"महाराष्ट्र समाज गौरव पुरस्कार"मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.