पंडीत वसंतराव शिरभाते यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त बोधडीत संगीत सभा

 




गावाकडची बातमी स्थानिक विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 


किनवट : तालुक्यातील बोधडी (बुद्रूक ) येथील अंध विद्यालयाचे संगीत विभाग माध्यमातून हजारो अंध विद्यार्थ्यांच्या जीवन स्वर प्रकाशाने उजळुन अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आदर्श गुरूजी स्व. पंडीत वसंतराव शिरभाते यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिना निमित्त बोधडी येथे मंगळवारी (ता.24 डिसेंबर) स्मृती संगीत सभा आयोजित केली असून यामधे नांदेड येथील सुप्रसिध्द सतार वादक कलावंत पं. अतुल देशपांडे 

( पं. रामकृष्ण जोशी यांचे शिष्य) यांचे सतार वादन आणि स्व. पंडीत वसंतराव शिरभाते यांचे शिष्य व सुपुत्र पंकज शिरभाते यांचे व्हायोलिन वादन संपन्न होईल त्यांना सुप्रसिद्ध तबला वादक रमाकांत जोशी हे तबल्यावर संगत करतील.

       हा कार्यक्रम आदिवासी कला शिक्षण संस्था किनवट संचलित अंध विद्यालय बोधडी बुद्रुक येथे सायंकाळी सहा वाजता आरंभ होईल. पहिल्या पुण्यस्मरण निमित्त अनहत व ऐनोद्दीन शेख वारसी यांचे बासरी वादन. दुसऱ्या पुण्यस्मरण निमित्त ह. भ. प. भालचंद्र महाराज सरदेशपांडे यांचं नारदीय कीर्तन, तिसऱ्या पुण्यस्मरण निमित्त युवा कलाकार मानसी देशपांडे, स्वरूप देशपांडे व प्रशांत गाजरे यांचे गायन आणि तबला वादन असे बहारदार कार्यक्रम संपन्न झालेले आहे.

      बोधडी येथील अंध शाळेचे संगीत विभाग प्रमुख म्हणून स्व. पं. वसंतराव शिरभाते यांचे पट्टशिष्य व गुणी संगीत शिक्षक राजेश ठाकरे समर्थपणे गुरुजींचा वारसा चालवीत आहेत. तेव्हा चतुर्थ स्मरण दिनानिमित्त परिसरातील संगीत रसिकांनी या संगीत कार्यक्रमास अवश्य यावे असे आवाहन आयोजक आदिवासी कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजू भीमराव टारपे, सचिव प्रकाश भीमराव टारपे (सचिव) व अंध विद्यालयाच्या प्राचार्या नंदा नवसागरे तसेच शिरभाते परिवार आणि सर्व विद्यार्थीवृंद यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post