गाव सहेली & गावाकडची बातमी टीम
उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक सिकलसेल हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम दिनांक ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर ह्या सप्ताहाभर त्याचा प्रचार व प्रसार करूंन सिकलसेल बाबत जनजागृती...
लग्नाआधी करा विचार..! सिकलसेलचा टाळा आजार..!
"सुद्रुढ भारताचा एकच ध्यास करुनिया सिकलसेलचा ह्रास " या थिमखाली व स्लोगन खाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यापैकी आज दिनांक ११ डिसेंबर २०२४ ला या कार्यक्रमाचे उद्घाटन करूंन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाला मंचावर डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक, वंदना विनोद बरडे अधीसेवीका, अनिता ठाकरे पाॅथालाॅजीस्ट उपस्थित होते.डाॅ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी मार्गदर्शन केले.वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी प्रास्ताविक केले.
संदिप निमकर हे डबल एस पाॅटर्न पाॅझिटीव्ह सिकलसेलचे रुग्ण आहे.त्यांच्या पत्नी ह्या एस पाॅटर्न पाॅझिटीव्ह सिकलसेलचे आहे.दोघांचा विवाह झाला.त्यांनी छान मुलाला जन्म दिला.हे शक्य झालं .चांगली जिवन शैली.आणी आजारा प्रती सकारात्मकता . म्हणजे त्यांनीं दुःखाला धरुन न बसता त्यावर कशी मात करायची आणि आपलं आरोग्य कस चांगलं ठेवता येईल यावर भर देवुन आपलीं जिवन शैली बदलुन औषधोपचार बरोबर चालु ठेवले म्हणून शक्य झाले.त्यासाठी वैद्यकीय अधीक्षक व मंचावरील मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.सुत्र संचालन नेहा ईंदूरकर काऊंसीलर व आभारप्रदर्शन पुनम धांडे सिकलसेल टेक्निशियन यांनी केले.आलेल्या सर्व लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
सेल्फी पाईन्टवर फोटो काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती.खानपान , आहार विहार,सकस, संतुलित,व चौरस आहार घेवून व्यायाम, प्राणायाम,मेडिटेशन करुन व सकारात्मक विचार केले तर या आजारांवर मात करुन चांगले जिवन जगु शकतो.याचा प्रचार व प्रसार आणि जनजागृती करणे आणि लग्नं करताना दोन्ही व्यक्तीने आपली सिकलसेल व इतर तपासण्या करुनच वैवाहिक जिवन जगावे असा सल्ला देण्यात आला.कार्यक्रमासाठी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Tags : #जिल्हा_परिषद_आरोग्य_विभाग, #स्वच्छ_भारत #सुंदर_भारत, #भारत #गावसहेली #गावाकडचीबातमी GavakadachiBatmi Maharashtra India chandrapur #उपजिल्हा_रुग्णालय_वरोरा #चंद्रपूर #वंदनाबरडे #लग्नाआधी_करा_विचार, #सिकलसेलचा_टाळा_आजार