मूर्तिजापूर - तालुक्यातील जांभा बु येथे स्व.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट कॉटन योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर यांच्या वतीने शेतकरी हितार्थ आयोजित कपासीच्या वेचनीपुर्वीचे प्रशिक्षण दिनांक १० डिसेंबर रोजी संपन्न झाले.
प्रकल्पामधील मास्टर ट्रेनर तथा मंडळ कृषि अधिकारी विजय वानखडे यांनी स्मार्ट प्रकल्पाबद्दल विस्तृत असे मार्गदर्शन केले कृषी पर्यवेक्षक चव्हाणयांनी कापूस पिकावरील कीड रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले व कापूस गाठी तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी सहायक अविनाश तायडे यांनी केले. या प्रशिक्षणाला गट प्रवर्तक शेतकरी व गटामधील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.