गावाकडची बातमी प्रतिनिधी अनिल पाटणकर
अमरावती : भगवाणपूर यावली शहीद येथील शेतकरी गजानन सोनोने यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण गोठा तसेच 7 जनावरे आगीमुळे होरपळल्या गेले तसेच गोठ्यातील जवळपास 5 किंटल वेचलेला कापूस,खते,औषधी व शेतीउपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.
दि.12/12/2024 रोजी सदर शेतकऱ्याच्या शेतातील लागलेल्या आगीची घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.सदस्य प्रकाश साबळे यांनी तिथे भेट देऊन विचारपूस केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात अवगत करून सदर शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात आश्वस्त केले.
या प्रकरणाची माहिती तिवसा विधानसभेचे नवनियुक्त आमदार राजेश वानखडे यांना पण अवगत करण्यात आली.
याप्रसंगी संपूर्ण सोनोने परिवार तसेच संदीप पाचघरे, योगेशराव निंबोरकर उपसरपंच यावली, अविनाश वानखडे व संबंधित सर्व विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते..