रासायनिक खतांसोबत लिंकिंग बंद करा अथवा पूर्ण जिल्ह्यामध्ये खतांची खरेदी बंद केली जाईल नाडाचा सर्व कंपनी डीलर्सला कडकडीत इशारा

 



 गावाकडची बातमी: तालुका प्रतिनिधी आनंद मगर

नासिक जिल्ह्यात सर्व रासायनिक खते कंपन्या सर्वच मिश्र खतांबरोबर लिंकिंग मटेरियल विक्रेत्यांना देतात. यामुळे शेतकरी व विक्रेते यांच्यात वाद होतात. याकरता आज नाडातर्फे जिल्ह्यातील सर्व नासिक दिंडोरी चांदवड सिन्नर नांदगाव येवला मनमाड त्रंबकेश्वर विक्रेत्यांची बैठक घेऊन माननीय अधीक्षक कृषी अधिकारी यांना लिंकिंग बंद करावी. असे निवेदन देण्यात आले. 




महाराष्ट्र शासन व कृषी विभाग कृषी आयुक्त पुणे यांचे सक्तं लिंकिंग करू नये असे आदेश असताना सर्व कंपन्या लिंकिंग करीत आहे. असे नाडाच्या निदर्शनास आले आहे. तरी याबाबत कृषी आयुक्त कार्यालय पुणे व कृषी अधिकारी नाशिक जिल्हा यांनी यावर कठोर कारवाई करावी अन्यथा नाडातर्फे सर्व स्तरावरच्या खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. असा कडकडीत इशारा सर्व कंपनी डीलर्स देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post