मुंबई(प्रतिनिधी-गुरूनाथ तिरपणकर)
मालवणी भाषा ही जगाच्या पाठीवर नेऊन ठेवली ती म्हणजे कै मच्छिंद्र कांबळी यांनी. आणि त्याच मालवणी भाषेत संपूर्ण कोकण दर्शन घडवलं गीतकार संगीतकार ध्वनिमुद्रक श्रीकृष्ण सावंत यांनी.
साध्या सोप्या सरळ मालवणी भाषेत प्रत्येक कोकणी माणसाला आवडेल असे गीत संपूर्ण महाराष्ट्राने उचलून धरलं.
मागील वर्षी कनेडी विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संमेलनात या गीताच सादरीकरण झालं.
आणि सोशल मीडियावर या गाण्याने धुमाकूळ घातला.
कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावामधील महिला गायकांनी ते गायलं असून त्याच गावच्या महिला कलाकारांनी हे गीत साकारल.
उज्वला सुकाळी यांनी
या गीताच नृत्य दिग्दर्शन केलं. दिपाली सावंत, कल्याणी वाक्कर यांनी या गीतासाठी प्रचंड मेहनत घेतली.
रंजना सावंत, साक्षी सावंत, निधी सावंत, उज्वला सुकाळी, शुभांगी सावंत यांनी हे गीत गायलं. गावामधील 42 महिला या गाण्यात सहभागी झाल्या.
हे गीत साकारण्यात श्रीकृष्ण सावंत यांचा मोलाचा वाटा आहे. या गीतामुळे कोकणचे नाव सातासमुद्रापार गेले यात शंकाच नाही.सर्व महाराष्ट्रातून या गीताची प्रशंसा होत आहे. आणि त्याचे सर्व श्रेय हे श्रीकृष्ण सावंत आणि सर्व भिरवंडेकर महिलांचे आहे. हे गीत प्रत्येक कोकणी माणूस गुणगुणत आहे.
आमचो कोकण या मालवणी गीतामध्ये दीपाली सावंत, शुभांगी सावंत,कल्याणी वाक्कर,अस्मिता सावंत,राजश्री सावंत,.उज्वला सुकाळी,ज्योती सावंत,मंजिरी सावंत,.संजिवनी सावंत,स्नेहल दळवी या भिरवंडेकर महिलांनी नृत्य आणि गायन या कलाविष्काराने 'आमचो कोकण'ही गीत सर्वांगसुदर करुन जगाच्या पाठीवर अजरामर केले त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.