मूर्तिजापूरात निघाली भव्य दिव्य श्रीराम नवमी शोभायात्रा
मूर्तिजापूर :- गेल्या २१ वर्षांची परंपरा कायम ठेवत येथील महाराष्ट्रीय हिंदी भाषी बहुउद्देशीय संस्था मुर्तीजापुर द्वारा संचालित श्री राम जन्म शोभायात्रा समिती च्या वतीने १० देखावे व ३ मंडळे समवेत भव्य दिव्य श्री राम नवमी शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रेमध्ये ॲकाडेमीक हाइट्स स्कूल,सेंट झेवियर्स,मालाणी शाळा तसेच आबालवृद्धांसह महिला व बालगोपाल यांनी सहभाग नोंदविला, शोभा यात्रेतील विविध देखावे प्रस्तुत करणाऱ्यांचा आमदार हरीष पिंपळे यांनी शाल,पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी पूजन केले.
या शोभायात्रेची सुरुवात पहाडीपुरा राममंदिरपासून करण्यात आली. या शोभायात्रेत विविध ठिकाणी राम भक्तांसाठी अल्पोपाहार, चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांच्यासह गुलाब दुबे, अशोक दुबे,चंद्रकांत तिवारी,रतनलाल महाजन, कुर्मी सर,संजय गुप्ता, कैलाश महाजन, अमोल प्रजापती,सोहम सरवरे,शालिग्राम यादव, रितेश गुप्ता, रमेश गुप्ता, प्रशांत हजारी भूपेंद्र शुक्ला, अभय पांडे, संजय जयस्वाल, वैभव यादव, डॉ. हितेश पांडे, डॉ, गौरव महाजन, डॉ. अपर्ण दुबे, डॉ. प्रवीण पालीवाल, संध्या दुबे राधा तिवारी,अनिता हजारी,अनिता देविकर, रेखा गुप्ता, ननका पांडे, किशोर ठाकूर,कन्हैयालाल गुजर, जगदीश कुंभेकर, मनोज गुप्ता,दिवाणसिंग ठाकूर, भारत जमादार, डॉ. पवन पातालबंशी ॲड. राजेश हजारी, ॲड त्रिपाठी बंडू भगत, सनद दुबे, केतन तिवारी,विशाल गुप्ता, संतोष यादव,केवल यादव, संदीप जळमकर,कमलाकर गावंडे, भारत जोशी,संजय देवीकर,आनंद गुप्ता, संतोष श्रीवास, मुन्ना श्रीवास, राजू श्रीवास व इतर रामभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.