युवासेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे यांची यशस्वी मध्यस्थी
अप्पर वर्धा धरण ग्रस्त कृती समितीचे वतीने सतत ३१८ दिवस आत्मक्लेश आंदोलन मोर्शी तहसिल येथे सुरू होते. विदर्भातील सर्वाधिक दिवस चाललेल्या आंदोलनापैकी हे ऐक आंदोलन असून शेतकरी अजुनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
खुप मोठी व लक्षवेधक आंदोलने या ३१८ दिवसांमध्ये धरण ग्रस्त कृती समितीचे वतीने करण्यात आली. दिनांक १८ जुन ला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या व उध्दव ठाकरे यांनी विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले.
अंबादास जी दानवे यांनी समितीचे पदाधिकारी यांना आपल्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी बोलवून बैठकीची वेळ व तारीख निश्चित करून घेतली. हि बैठक सचिव स्थरावर होत असुन या मधे महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव, जलसंपदा सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिव हे या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
तसेच अमरावती व वर्धा जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी व अप्पर वर्धा प्रकल्पचे कार्यकारी अभियंता हे या बैठकीस उपस्थिती देतील
या बैठकीत जमिनी संदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार असल्याचे सूत्रांच्या माहितीने समजले.
सर्व धरण ग्रस्त शेतकरी या बैठकीसाठी उत्सुक असून सगळ्यांची नजर या महत्त्वाच्या बैठकीकडे आहे.
या बैठकी साठी युवासेना जिल्हा प्रमुख व या आंदोलनाचे नेतृत्व करणारे उमेश शहाणे यांनी विषेश प्रयत्न केले.