मूर्तिजापूर - विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीष पिंपळे यांच्या कार्यकर्त्याला बार्शिटाकळीचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन "अश्लील शिवीगाळ" केल्याने ह्या प्रकरणांत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिल्याने ठाणेदाराची "झटक्यात" मुख्यालयी बदली क ।रून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत यावर आमदारकीचा धसका दाखविला असल्याचे दिसून येत आहे.
आज सकाळी बार्शिटाकळी पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुरांची तस्करी करणारे वाहन जात असल्याची माहिती आमदारांच्या कार्यकर्त्याने बार्शिटाकळी पोलिसांना दिली होती.मात्र त्यांनी ह्या वाहनावर कोणतीही कारवाई न करता हे वाहन सोडून दिल्याचे लक्षात येताच ह्या कार्यकर्त्याने त्या वाहनाचा पाठलाग करीत आमदार हरीष पिंपळे यांना ही बाब सांगितली. पिंपळे ह्यांनी संबंधित ठाणेदाराला ह्या बाबत विचारणा केल्याने चिडलेल्या ठाणेदार तूनकलवार ह्याने ह्या कार्यकर्त्याला फोन करून आमदारांला चुगल्या सांगतो म्हणून अत्यंत घाणरड्या भाषेत खालच्या स्तरावरील अश्लील शिवीगाळ केली.ह्या कार्यकर्त्याने ठाणेदाराने वाहिलेल्या शिव्यांच्या लाखोलीची रेकॉर्डिंग करून ती आमदार हरिष पिंपळे यांना दिली.त्यांनी त्यातील ठाणेदाराने कार्यकर्त्याला दिलेल्या शिव्या ऐकून त्यांचेही मस्तक फिरले व त्यांनी ही रेकॉर्डिंग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना पाठविली.सोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून स्वतःची रेकॉर्डिंग करून पाठविली असून, त्यात त्यांनी म्हटले की," माझ्या कार्यकर्त्याने गुरांची वाहनातून तस्करी होत आहे म्हणून ठाणेदार यांना सांगितले व त्या वाहनाचा पाठलाग केला.त्याचवेळी ठाणेदाराने वाघ नावाच्या ह्या कार्यकर्त्याला फोन करून अत्यंत खालच्या पातळीवरील शिव्या दिल्या,त्याचवेळी मी फोन केला असता मलाही शिवीगाळ केली.जर आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिस अधिकारी अशी शिवीगाळ करीत असतील तर आमदारांची किंमत काय राहील..?" ह्या ठाणेदाराचे तात्काळ निलंबन करण्यात यावे अशीही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिस अधीक्षक अकोला यांना कारवाई करून अहवाल मागितला असून बार्शीटाकळी ठाणेदार प्रकाश तुनकलवारला मुख्यालयात "अटॅच" करण्यात आले आहे. अकोटचे सहायक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांना ह्या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले असून बार्शिटाकळी पोलिस ठाण्याचा तात्पुरता प्रभार एपीआय दीपक वारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.