विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर
वर्धा - हिंगणघाट येथील वाघोली उच्च प्राथमिक शाळेत झालेल्या विष बाधा प्रकरणी मध्यान्ह भोजनातुन देत असलेले अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आलेले आहे. त्यानंतर सदर प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यांत येईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी दिली.
दि. 10 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोली पंचायत समिती हिंगणघाट येथे शाळेच्या मध्यान्ह भोजनातुन 49 विद्यार्थी व 02 शिक्षकाना विषबाधा झालेली आहे. त्यापैकी 15 विद्यार्थीची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना रुग्णालयातुन सुटी झालेली असुन उर्वरीत 34 विद्यार्थी व शिक्षक यांचेवर रुग्णालयात उपचार सुरळीत सुरु असुन सर्व विद्यार्थी व शिक्षकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
याबाबत दि. 11 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान व डॉ.नितू गावंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, वर्धा गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती हिंगणघाट व शोलय पोषण आहार अधिक्षक हिंगणघाट यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघोली पंचायत समिती हिंगणघाट तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेले विद्यार्थी व शिक्षकांची रुग्णालयात जाऊन भेट घेवुन त्यांचे तब्येतीची चौकशी केली. मध्यान्ह भोजनातुन देत असलेले अन्न व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करिता पाठविण्यांत आलेले आहे. त्यानंतर सदर प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यांत येईल याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सांगितले.
आ.समिर कुणावार यांच्यासह जितीन रहमान यांनी भेट घेऊन केली प्रकृतीची चौकशी
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. या विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना तातडिने हिंगणघाट येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आमदार समिर कुणावार व मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. त्यांनतर त्यांनी शाळेला सुध्दा भेट दिली.
रुग्णालयात दाखल असलेल्या विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना सर्व प्रकारच्या वैद्यकिय सुविधा पुरविण्यात येतील असे जितीन रहमान यांनी सांगितले. यावेळी आ. समिर कुणावार व मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी शाळा प्रशासनालाही विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याच्या सुचना केल्या. सदर प्रकार नेमका कशामुळे घडला याबाबत त्यांनी माहिती घेतली यापुढे आवश्यक काळजी घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.