गावाकडची बातमी | नेरपिंगळाई ग्रामपंचायत मार्फत घाणेरड्या पिण्याच्या टाकीतून होतो नागरिकांना पाणी पुरवठा

नागरिकांचे आरोग्य धोक्यात             

                      

 नेरपिंगळाई, स्थानिक प्रतिनिधी‌ प्रविण पाचघरे 

नेरपिंगळाई  : येथील ग्रामपंचायत ही एकूण सतरा सदस्यांची असून या गावाची लोकसंख्या जवळपास तिस हजार आहे. या गावाला नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या एकूण चार टाक्या आहेत.परंतु गावकऱ्यांनी या टाक्यांची  पाहणी केली असता त्या कित्येक महिन्यांपासून वा कित्येक वर्षांपासून स्वच्छ केलेल्या दिसून येत नाही.यावरून नेरपिंगळाई ग्रामपंचायतच्या सरपंच गावातील नागरिकांच्या आरोग्याप्रती किती सजग आहे हे दिसून येते. गावाचा कारभार घरून वा AC कॅबिन मधे बसून चालविणाऱ्या सरपंचांनी जरा एकदा तरी या पिण्याच्या पाण्याच्या टाकींबद्दल शहानिशा करून त्या स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला का हा जनतेचा प्रश्न आहे. 



    त्याकरिता आज दि.११ डिसेंबर रोजी गावकरी अर्ज देण्याकरिता व विचारणा करण्याकरिता गेले असता ग्रामपंचायत मध्ये सरपंच वा सचिव कोणीही आढळून आले नाही.यावरून गावाचा सरपंच गावाचा विकास करण्यास किती सक्षम आहे हे दिसून येते.रस्त्याच्या पोलवरील लाईट एक महिन्यांपासून बंद आहे.



गावामधील पाणी सोडण्याचे लिकिज वॉल अद्यापही दुरुस्त केले नाही.गावात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे महिन्यांपासून तसेच पडून आहेत.त्यामुळे स्क्रब थायपस सारख्या भयानक आजारांचे रुग्ण या गावात आढळून येत आहे.गावात कुठलीही आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास याला सदर सरपंच , सचिव जबाबदार राहील.या सर्व समस्यांच्या निराकरणासाठी आज ग्रामपंचायत ला विनंती अर्ज करून ताबडतोब पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करून पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायत विरोधात आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.






Tags : #ग्रामपंचायत #गावाकडचीबातमी #स्वच्छ भारत #सुंदर भारत #gavakadachiBatmi #दुषितपाणी #आरोग्यविभाग #आरोग्यधोक्यात #ग्रामविकास #महाराष्ट्र #पंचायत_समिती_मोर्शी #अमरावती #जिल्हापरिषद 

Post a Comment

Previous Post Next Post