मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी
मुर्तीजापुर कारंजा बस क्रमांक 5521 कारंजा आगाराचे वाहक दिनेश भगत आणि चालक अतुल रक्ताटे यांच्या समय सूचकतेने आठ वर्षीय हार्दिक संदीप राक्षस कर नावाचा मुलगा हा पालकांच्या स्वाधीन करण्यात आला.
हाकिकत अशी की भंडारज येथील रहिवाशी संदीप राक्षस कर हा परिवार मुर्तीजापुर वरून नाशिकला अंत्यविधी कार्यक्रम आटोपण्यासाठी दिनांक पाच ला गेला त्यांचे सोबत सासुरवाडी भटोरी येथील इतर परिवार आणि नाते सुद्धा होते सर्व कार्यक्रम आटोपून हा पूर्ण परिवार मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळीच नाशिक. बडनेरा मेमू गाडीने मूर्तीजापूर पोहोचला त्याच वेळात त्यांची मूर्तीजापुर बस स्थानकावरून मूर्तियापुर अकोला मार्गे म्हेसांग भटोरी बस लागली होती याच वेळात मूर्तिजापुर. कारंजा ही बस सुद्धा बस स्थानकावर लागली होती बसनाच्या घाई गडबडीत सर्व मंडळी भटोरी मार्ग अकोला बस मध्ये चढली परंतु हा आठ वर्षाचा हार्दिक त्या बसमध्ये न चढता बाजूच्या कारंजा बसमध्ये चढला दोन्ही बसेस मार्गस्थ झाली कारंजा रोडवरील बस उमरी नजीक पोचल्यावर वाहक दिनेश भगत यांनी चालत्या बस मध्ये मागे टिकीट फाडण्याच्या हिशोबाने जाऊन पाहिले असता हा लहान मुलगा एकटाच दिसला वाहकांनी त्याला हटकले असता तो रडू लागला बरोबर उत्तरं देऊ शकल्यामुळे वाहतूक दिनेश भगत यांनी चालकांच्या नजरेत हा प्रकार आणला चालक अतुल रक्ताटे यांनी सदर पूर्ण बस मुर्तीजापुर बस स्थानकावर आणली बस स्थानकावर वर्तमानपत्र विक्रेता यांचे समोर पूर्ण हकीकत बयान करून तिथे त्याला विचारपूस करून सदर मुलगा हा भटोरी येथील नातेवाईक असल्याचे लक्षात आल्यावर मोबाईल वरून भटोरी येथे आणि भटोरी येथील परंतु मुर्तिजापूर राहणारे दशरथी परिवार यांच्याशी संपर्क साधून सदर मुलगा पालकाच्या स्वाधीन करण्यात आला.
यामध्ये सदर मुलगा बिछडण्याचे कारण असे की पूर्ण परिवार हा बसणे भटोरी गेला व सदर मुलाचे वडील हे त्याच्या टू व्हीलर ने भटोरी गेले.
या वेळी आईला वाटले मुलगा वडीला सोबत आहे तर वडिलाला वाटले मुलगा आई सोबत आहे अशी चुकामुक झाल्यामुळे हा प्रकार घडला.
या पूर्ण प्रक्रियेमध्ये वर्तमानपत्राचे मुख्य वितरक दीपक अग्रवाल . पत्रकार रोहित सोळंके बस वाहक दिनेश भगत चालक अतुल रक्ताटे सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट अविनअग्रवाल ऑटो चालक नजीर भाई व इतरांचे सहकार्य मिळाले मुलगा पालकाच्या स्वाधीन झाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते.