डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-काही व्यक्ती समाजासाठी सत्कार्य करण्यासाठी सर्व समावेशक,सकारात्मक समाजसेवा करण्यासाठी प्रेरीत असतात आणि अशी कामे ते निरंतर करत असतात.असेच हे डोंबिवली येथील समाजसेवी व्यक्तीमत्व म्हणजे अरविंद सुर्वे.अरविंद सुर्वे यांनी त्यांच्या मुळ गावी मौजे.कोंडमाळा,ता.चिपळुण येथील शिर्के वाडीतील दयनीय अवस्थेतील स्मशानभूमी सुशोभिकरणाचे काम हाती घेतलेले आहे.येथील आदर्श शिक्षकांचा सत्कार,जेष्ठ नागरीकांचा सत्कार,म्युझिक मंत्रा इंटरटेनमेंट संस्थेला त्यांचे विशेष योगदान असते,असे अनेक उपक्रम अरविंद सुर्वे हे राबवित असतात.त्यांच्या या समाज उपयोगी कार्याची दखल प्रेरणा फाऊंडेशन महाराष्ट्र सामाजिक संस्था व प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळाच्या संस्थापिका-अध्यक्षा प्रेरणा वैभव कुलकर्णी व सचिव वैभव कुलकर्णी यांनी घेतली.नुकताच अरविंद सुर्वे यांना बल्लाळेश्वर मंगल कार्यालय,बदलापूर(पश्चिम)येथे प्रतिथयश आदरणीय मान्यवरांच्या हस्ते"समाजभुषण पुरस्काराने"समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
प्रेरणा फाऊंडेशन गेल्या सहासात वर्षात रस्त्यावरील गोर गरीब,भटकंती करणा-या लोकांना,अनाथांना जेवण,आर्थिक मदत,रोजगार अशी मदत केलेली आहे.आदिवासी पाडे येथील मुलभुत गरजा,रेल्वे,एस.टी.डेपो परिसर स्वच्छता अभियान,अनाथाश्रम,वृध्दाश्रम यांना सौ.प्रेरणा वैभव कुलकर्णी यांनी मदत केली आहे.या प्रेरणा फाऊंडेशन व प्रेरणा रंगमंच नाट्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्रातील प्रतिभावंत व्यक्ती हजर होत्या.प्रेरणा फाऊंडेशनच्या वतीने"समाजभुषण पुरस्कार"दिल्या बद्दल अरविंद सुर्वे यांनी अध्यक्षा प्रेरणा वैभव कुलकर्णी व सचिव वैभव कुलकर्णी यांचे आभार मानले आहेत.अरविंद सुर्वे यांना"समाजभुषण पुरस्कार"मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.