" अमित शहा यांच्या त्या व्यक्तव्याचा जन आक्रोश निषेध मोर्चा"




वाशीम जिल्ह्यातील तालुका मालेगांव येथे दिनांक 27 डिसेंबर ला अमित शहा यांच्या बेताल विधानावर जन आक्रोश निषेध मोर्चा"


 मोर्चा चे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्धी पत्रकातून हजारोंचे संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हम आंबेडकरवादी है....! संघर्षोके आदी है...!


परभणी येथील घडलेल्या घटनेची स्वतंत्र आयोगामार्फत चौकशी करुन तेथील दोषी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहीजे. अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अपमान जनक वक्तव्य केल्यामुळे त्यांचा राजीनामा झालाच पाहीजे व अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.


आंबेडकरी विचारधारेच्या व संविधानावर प्रेम करणाऱ्या तसेच तमाम पक्ष, संघटना, संस्था व विविध गटा तटाच्या कार्यकत्यांना व जनतेस आवाहन करण्यात येते की, परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली. तद्नंतर तेथील आंबेडकरी जनतेनी त्या घटनेचा निषेध करण्याकरीता आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये पोलिसांनी कार्यकत्यांना तसेच महिलांना प्रचंड अमानुष मारहान केली व त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. इतकेच नव्हे तर या घटनेमध्ये भिमयोध्दा सोमनाथ सुर्यवंशी याला बेदम अमानुष पोलिसांच्या मारहाणीमुळे न्यायालयीन कष्टडीमध्ये आपला जीव गमवावा लागला. ही फार मोठी दुःखदायक घटना आहे. सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. त्यामध्ये बौध्द वस्त्या टार्गेट करुन अनेक निरपराध लोकांवर लाठीचार्ज करुन जबर मारहान करुन कोणाचे डोके फोडले, कुणाचे हात पाय तुटले, कुणाचे डोळे फुटले, कुणाच्या गाड्या फोडल्या, त्यामध्ये बरेच भिमसैनिक अपाहीज झालेत. तरी सुध्दा या मनुवादी विचाराच्या, सडक्या मेंदुच्या, जातीवादी मानसिकतेच्या पोलिसांनी निरपराध लोकांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. त्या केसेस मागे घेण्यात आल्या पाहीजे व सोमनाथ सुर्यवंशी याला न्याय मिळाला पाहीजे. यासाठी व झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच आपल्या देशाच्या संसदमध्ये गृहमंत्री अमित शहा असे म्हणाले की, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळेल. 

    या मोर्चाच्या निमित्ताने तडीपार गृहमंत्री अमित शहांना सांगायचे आहे की, आम्हाला देव आणि स्वर्ग याची भिती दाखवुन मनुवाद्यांनी हजारो वर्ष गुलाम केले. या गुलामीतून आम्हाला फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच मुक्त केले आहे. म्हणुन आम्हांला देव आणि स्वर्ग याची भिती दाखविण्याची किमया अमित शहाचा प्रयत्न हा मनुवादी विचाराचा मनसुबा आहे. आम्ही अस मानतो आम्हांला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच देव आणि स्वर्गापेक्षाही मोठे आहेत. आम्ही खातो ते घास आणि घेतो तो श्वास हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचे भुषण आहे. त्यांनी त्यांची तब्येत ठिक नसतांना सुध्दा रात्रीचा दिवस करुन हाडाची काड करुन रात्रंदिन मेहनत घेवुन या देशाचे संविधान ज्या संसद भवनामध्ये लिहीले, त्याच संसद भवनामध्ये संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होत असतांना संसद मध्ये गृहमंत्री अमित शहा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अपमानजनक वक्तव्य करत आहे.

    हे अतिशय खेद जनक आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्त्व्यातुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रति आपण केलेले वक्तव्य बाबासाहेबांच्या कार्याची व विचाराची मुद्दामुन टेहाळणी केल्याचे दिसुन येत आहे. अहो अमित शहा तुम्ही बाबासाहेब आंबेडकर न म्हणता उठता बसता, हागता मुतता, आठही प्रहारी भगवान, भगवान, भगवान करताय तरीही अजुन तुम्ही नाही पोहचला स्वर्गात ७ जन्मासाठी, का बरं नाही पोहचला ? अहो अमित शहा तसही मर्डर केस मध्ये तुमच्या स्वतःच्या राज्यातुन तुम्ही तडीपार राहीलेला तुमची लायकी ती काय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची. गृहमंत्री अमित शहा तुमच्या या बेताल वक्त्यांवर व अभद्र विधानाबद्दल जाहीर निषेध..!

 गृहमंत्री अमित शहा आम्हांला अस म्हणवंस वाटतेय, दिन रात हमने प्रार्थनायें खुब की, भगवान की, इतना स्मरा उसे, इतना स्मरा उसे, की परवा न की जान की...! इतने पर भी ना उसने हमें कोई शक्ती दान की, जालिम और मजलूम की, ना उसले पहचान की, पहचाननेवाला न कोई राजा था, न कोई ईश्वर था, अगर था कोई तो वो डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर था...! डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर था...!


म्हणुनच या धर्तीवर अनुसुचित जाती जमाती, ओबीसी, अल्पसंख्यांक अशा हजारो जातीच्या लोकांना लोकशाही देवुन भारतीय राज्यघटनेद्वारेच आम्हांला सर्व हक्क, अधिकार दिले व बलशाली बनविले आहे. म्हणजे हेच आम्हांला स्वर्गापेक्षाही जास्त आहे. असे आम्ही मानतो. म्हणुनच महामहिम राष्ट्रपतीजी भारत सरकार यांना विनंती करतो की, बेताल वक्त्यव्य करणाऱ्या अमित शहा यांचा त्वरीत गृहमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा ही विनंती.


 या मोर्चाद्वारे आम्ही खालील मागण्या...


१) परभणी प्रकरणात ज्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. त्या केसेस वापस घेण्यात याव्यात.


२) जो भिमयोध्दा सोमनाथ सुर्यवंशी शहीद झाला त्याच्या कुटूंबाला शासनाने ५ कोटी रुपयाची सानुग्रह मदत देण्यात यावी. तसेच त्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नौकरी देण्यात यावी व या हत्येला जबाबदार असलेल्या दोषी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करुन त्यांना बडतर्फ करण्यात यावे.


३) परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड प्रकरणी व सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्या प्रकरणाची चौकशी एका स्वतंत्र आयोगाकडुन करावी.


४) देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा महामहीम राष्ट्रपती महोदयांनी घ्यावा.


५) देशामध्ये एस सी/एसटी समुदायावर सतत होत असलेले अन्याय, अत्याचार व खोट्या केसेस दाखल होतात ते त्वरीत थांबविण्यात यावे.


आयोजक : आंबेडकरी चळवळीचे नेते बबनराव बनसोड, भाई गोवर्धनजी चौथमल, जे. एस. शिंदे, देवा इंगळे, अजाबराव सदार, विनोदभाऊ अंभोरे, प्रा. गोविंद वैद्य, बाळासाहेब सावंत, भारत गुडदे, कैलास तायडे, सुनिल तायडे, प्रकाश गवई (मा.पं.स.सदस्य), प्रकाश आठवले, अमोल पखाले, गजानन रोकडे, किशोर मोरे, अॅड. विजय बनसोड, अॅड. राहुल गवई, अॅड. किसनराव सांळुके, अॅड. सतिष शिरसाठ, अॅड. भरत गायकवाड, अॅड. संघनायक मोरे, विलास गवळी, प्रा.रानुजी कांबळे, अरुण इंगळे, चेतन इंगळे, रुपेश भगत, नरेंद्र खडसे, भास्कर गुडदे, संजय शिंदे, शाहीर संजय इंगळे, रमेश इंगळे, रमेश तायडे, कृष्णा गायकवाड, रमेश संयोजक : केशव गुडदे, डॉ. एस. एन. इंगळे, गजानन वानखडे, विनोद भगत, गजानन वानखडे, रवि तायडे, कदीर भाई, दादाराव घुगे, रामेश्वर घुगे, विलासजी रोकडे, पत्रकार चंद्रकांत गायकवाड, एकनाथ गायकवाड मालेगांव, अनिल इंगळे, देवानंद सावळे, बाळसाहेब कंकाळ, सुरेश गुडदे, कैलास इंगळे, एकनाथ गायकवाड, संजय सोनुने, कंचनाबाई कांबळे, वर्षाताई अवचार, बेबीताई खंडारे, रंजनाबाई खडसे..

Post a Comment

Previous Post Next Post