प्रतिनिधी : पवन पाटणकर
अमरावती बडनेरा शिवसेना महानगर ची महत्वपूर्ण बैठक आज दिनांक 22/12/2024 ला रविवारी सायंकाळी सहा वाजता शिवसेना महानगर कार्यालय मोर्शी रोड अमरावती येथे शिवसेना महानगर प्रमुख संतोष बद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील केने तसेच महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेखाताई खारोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीमध्ये अमरावती बडनेरा शहरातील 87 वार्डामध्ये उमेदवार उभे करण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. व सर्वांनी आपापल्या प्रभागात शिवसेना पक्षाचे काम प्रामाणिक करावे ज्यांना कुणाला पक्षाचे बोर्ड लावायचे असेल तशा सूचना महानगर प्रमुखाला देण्यात याव्या अशा सर्व सूचना याप्रसंगी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेंद्र दारोकार, माझी नगरसेवक मधुकरराव शिंदे, शिवसेना सह संपर्कप्रमुख संजय पडसोतकर, शिवसेना सांस्कृतिक क्रीडाचे जिल्हाप्रमुख समीर कोरपे, शिवसेना शहर प्रमुख आशिष ठाकरे, उपशहर प्रमुख अजय महल्ले, मनोज पांडे, पंकज मुळे, सुरज चव्हाण, रोहित धोटे, सुरज बर्डे, रवींद्र सावरकर, राजेश भाऊ धोटे, संजय कडू, चेतन पिंजरकर, सुरज ढगेकर, प्रमोद तिखीले, युती सेनेच्या जिल्हाप्रमुख कोमल ताई बद्रे, सारिका ताई जैयस्वाल, ज्योती साहू, आरोग्य वैद्यकीय सेलच्या सोनाली देशमुख याप्रसंगी उपस्थित होते..