गावाकडची बातमी| सिंदगी मोहपुर परिसरात अस्वलाचा मुक्त संचार..! अस्वलाच्या भीतीने शेतकरी भयभित..!

 

             अनिल बंगाळे विशेष प्रतिनिधी 


नांदेड,सिंदगी मोहपूर -: आज सकाळी ठीक १० वाजता रामराव भिकू राठोड हे शेतात गेले असता अचानक त्यांच्या हरभऱ्यामध्ये अस्वलाचा मुक्त संचार पहावयास मिळाला आहे.


"महावितरण कंपनीने शेतकऱ्याची दखल घेऊन दिवसा लाईट देण्यात यावी"


 परिसरातील सर्व शेतातील शेतकरी वर्ग भयभीत होऊन शेताकडे रात्री पाणी देण्यासाठी कोणीही शेतकरी भीतीने जात नाही.

 तरी या घटनेची दखल घेऊन महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्यात यावी.

 अशी मागणी सिंदगी मोहपुर परिसरातील शेतकरी करीत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post