स्मार्ट कॉटन योजने अंतर्गत वेचनीपुर्व प्रशिक्षण ; बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती...!

 





मूर्तिजापूर - तालुक्यातील ब्रम्ही खुर्द येथे स्व.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट कॉटन योजने अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूर्तिजापूर यांच्या वतीने शेतकरी हितार्थ आयोजित कपासीच्या वेचनीपुर्वीचे प्रशिक्षण दिनांक ६ डिसेंबर रोजी संपन्न झाले.

              प्रशिक्षणाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून करण्यात आली. स्वच्छ कापूस वेचणीसह कापसाला जास्त भाव मिळविण्याच्या दृष्टीने गावातील सर्वच एकत्रीत येऊन कापसावर प्रक्रिया करून गठाणी बनवून विक्री केल्यास सामान्य कापसापेक्षा जास्त प्रमाणात भाव मिळू शकतो याबाबत कृषी पर्यवेशक अतुल राणे यांनी उपस्थीत शेतक ऱ्यांना सविस्तर माहिती दिली.सदरचे प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.

         या प्रशिक्षणाला सरपंच ललीता अनिल मोहोड, उपसरपंच मोहम्मद अली, ग्रामपंचायत सदस्य गण,तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद जाधव , ग्रामपंचायत अधिकारी समीर शर्मा,कृषी सहायक ज्योती बोळे, श्रध्दा पवार, तसेच कृषि सहाय्यक गोपाल मानकर ,ग्रा.पं.कर्मचारी नरेंद्र इंगळे यांच्यासह शेतकरी बांधव व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post