प्रतिनिधी : पवन पाटणकर
अमरावती: दि. 10-12-2024 रोज मंगळवार पासून महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना अमरावती शाखा यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण शिपाई संवर्गातील सरळ सेवा भरतीच्या 40 टक्के रिक्त जागा महसूल सेवक ( कोतवाल) संवर्गातून विना विलंब नियुक्ती करण्याबाबत संदीपची पळसपगार ( जिल्हाध्यक्ष, महसूल सेवक संघटना अमरावती ) यांच्या नेतृत्वात या मागणी करता उपोषणाला सुरुवात झाली आहे.
यामध्ये आमरण उपोषण कर्ते रवींद्र भागवतराव तायडे महसूल सेवक व त्यांचे सर्व सहकारी तसेच महसूल विभागात कार्यरत असलेले सर्व महसूल सेवक या उपोषणा मध्ये सहभागी झाले आहे. यावेळी रविंद्र तायडे यांच्याशी संवाद साधला असता जो पर्यंत त्यांच्या मागणीची अंबलबजावणी होणार नाही तोपर्यंत हे उपोषण बेमुदत सुरूच राहील सर्व महसूल सेवकांना न्याय मिळावा अशी त्यांची इच्छा आहे..