मुर्तिजापूर - शहरातील तिडके नगरमध्ये खुल्या जागेत वरली मटक्याच्या हार जीतचा जुगार खेळत असल्याचा गुप्त माहितीवरुन शहर पोलिसांनी धाड टाकली असता ४० हजाराचा मुद्देमाल घटनस्थळावरून रविवारी ४ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान जप्त करण्यात आला.
सरकार तर्फे हेड पोलिस कॉन्स्टेबल नंदू टिकार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना गुप्त माहिती मिळाली की तिडके नगरातील खुल्या जागेत हार जीतचा जुगार सुरू असल्याचा माहितीवरुन शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन थाटे ,अमंलदार नंदकिशोर टिकार, तेलगोटे यांनी धाड टाकली असता त्या ठिकाणी जयेश विनोद कोठारी हा वरली मटकाच्या आकड्यावर लोकांकडून पैसे घेऊन पैश्याची हार जीत नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना रांगेहात पकडल्या गेला . पोलिसांनी घटना स्थळावरून रोख ९५० रुपये , हिरोहोंडा मोपेड गाडी २० हजार , मोबाइल किंमत १५हजार असा एकूण ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून जयेश विनोद कोठारी यांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात कलम १२ अ महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अधिक तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
.jpeg)