नववर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन
नेरपिंगळाई : जय संताजी बहुउद्देशीय तैलिक समिती नेरपिंगळाई च्या वतिने रविवार दिनांक 8 डीसेंबर रोजी तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक थोर संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेच्या पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नंतर मागिल वर्षी ज्या समाज बांधवांचा, भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या पावन स्मृतिस मौन श्रध्दांजली अर्पण करून आदरांजली वाहिली तसेच नववर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले सदरहु कार्यक्रमात संपूर्ण समाजाची ऐकता,संघटन पाहुन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कृषी अधिकारी रामकृष्ण राऊत यांनी समाधान व्यक्त केले. समाजातील मुले,मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे त्यामुळेच समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे मत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटक उदयजी तायडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक राजिवजी अजमिरे, अनिल गुल्हाणे उपस्थित होते कार्यक्रमांचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष सुरज अवचार यांनी केले. संघटनेच्या कार्याची सविस्तर माहिती प्रास्ताविकातून देण्यात आली संघटनेचे सचिव विजय कपिले यांनी संताजी महाराजांचे जीवन कार्य आपल्या भाषणातून मांडले संताजी युवा संघटनेचे अध्यक्ष आशिष सापधारे यानी संताजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या भाषणातून मांडला महिला संघटनेच्या अध्यक्ष स्वाती बाखडे यांनी संत तुकाराम महाराज अभंग गाथा लिखाणात संताजी जगनाडे महाराज यांची भुमिका आपल्या मणोगतातुन व्यक्त केली संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनावर आधारित स्वरचित गित माया मालगे यांनी गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती मंगेश सावरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभांगी तुषार झापरर्डे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय संताजी बहुउद्देशीय तैलिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले कार्यक्रमाला समाज बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.