अमरावती येथे जिल्हा परिषद विश्रामगृह येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी पदाधिकाऱ्यांची बैठक युवा नेते प्रकाश साबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवारांना विद्या वेतन वाढ व अवधी वाढवून प्रशिक्षणार्थी विविध शासकीय आस्थापनेवर ज्या ठिकाणी रुजू झाले त्याच ठिकाणी त्यांना रुजू होण्याबाबतची मागणी सदर बैठकीत मांडली.
अमरावती जिल्ह्यात जवळपास 7200 प्रशिक्षणार्थी शासकीय आस्थापनेवर रुजू झाले असल्यामुळे त्यांचा विविध मागण्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी युवा सहकारी आकाश गढपाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संघटना नेमण्यात आली.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची युवा बेरोजगारांना उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रोजगार योजना सुरू केल्याबद्दल संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले.
राज्यस्तरीय युवाहित मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी युवा नेते व युवकांचा बुलंद आवाज प्रकाश साबळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी बुलढाणा, अकोला, जालना, वाशिम ,यवतमाळ, अमरावती येथील युवा कार्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी सर्व सन्माननीय नवनियुक्त आमदार व माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत देण्याचा ठराव करण्यात आला.
याप्रसंगी पदाधिकारी मंडळी उपस्थित होती. ओम चित्रकार (प्रतिनिधी) , ऋषिकेश माहुरे, निलेश भोगल, स्वरूप अंबाडकर, मधुसूदन पारिसे, कार्तिक टवलारे, प्रणिता गोटे, अक्षय सरोदे, याप्रसंगी पदाधिकारी मंडळी उपस्थित होती