मूर्तिजापूर - शहरात प्रकाशवाट प्रकल्पाच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या जवाहर नवोदय व एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मोफत शिकवणी वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची पूर्व सराव परिक्षा भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत शांततेत पार पडली.
ग्रामीण भागातील गोर-गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात या उदात्त हेतूने न्यायमूर्ती अनिल कीलोर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या " प्रकाशवाट " प्रकल्पाच्या माध्यमातून इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना सन २०२४ - २५ या सत्रात जवाहर नवोदय विद्यालय व इयत्ता आठवीतील विद्यार्थांना एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी " सुपर ५० " या शिर्षकाखाली मोफत शिकवणी वर्ग नगर परिषद कार्यालय परिसरातील एका सभागृहात सुरू करण्यात आले होते. यामध्ये शनिवार ,रविवार व दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थांना शिकवणी वर्गात त्या त्या विषयात प्राविण्य प्राप्त शिक्षकांकडून शिकवणी सुरु ठेवली. होऊ घातलेल्या परिक्षेत आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांकान यश प्राप्त व्हावे यासाठी परिक्षेच्या संदर्भाने विद्यार्थांना येणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी शिक्षक मोहम्मद अली यांनी सरावासाठी ठरविलेल्या परिक्षा केंद्रावर प्रार्थना संपल्या नंतर मोलाचे मार्गदर्शन केले व त्यानंतर आसन क्रमांकासह बैठक व्यवस्था केलेल्या वर्ग खोलीत विद्यार्थ्यांना प्रवेश देत होणाऱ्या परिक्षेप्रमाणे पुर्व सराव परिक्षा शांततेत पार पडली.
यासाठी एनएमएमएस सराव परीक्षा करिता परीक्षा प्रमूख शिक्षक अविनाश बांबल ,पर्यवेक्षक शिक्षक गजानन गिरी ,पर्यवेक्षक शिक्षक अभय हरणे तर जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षा प्रमूख शिक्षक ज्ञानेश ताले ,पर्यवेक्षक शिक्षक अभिजित देशमुख,पर्यवेक्षक शिक्षक मुरलीधर आगळे , अभय पजई,परीक्षा निरीक्षक शिक्षक मोहम्मद अली यांनी आपले कर्तव्य बजावले. मुख्य म्हणजे भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मुर्तिजापूर चे सर्व संस्था प्रमुख बंदिष्टे, पाठक आणि मुख्याध्यापक निता इंगळे यांनी या परीक्षे करीता शाळा उपल्ब्ध करून दिली व सर्वोतोपरी सहकार्य केल्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षे पूर्वी प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव घेता आला करीता त्यांचे विशेष आभार प्रकाशवाट प्रकल्प टीम नागपूर, मुर्तिजापूर यांच्या कडून करण्यात आले. तसेच संपुर्ण परीक्षेचे पेपर हे आमचे जिवलग मित्र आणि तंत्रस्नेही शिक्षक मनमोहन जामनिक हे अतीशय मेहनतीने तयार करून देतात त्यांचेही विशेष आभार तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांना नाश्ता उपल्ब्ध करून देणारे दाते सर्वांचे या कार्यात मोलाचे सहकार्य लाभत आहे. त्यांचे ही प्रकल्पाच्या वतीने आभार मानले.