अपघातात एक जखमी , बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुर्तिजापूर - राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील उड्डाणपुलावरुन मार्गक्रमण करीत जात असलेल्या ट्रकला बोलेरो या वाहनाने मागून धडक दिल्याने बोलोरा मधील एक जण जखमी झाल्याची घटना १४ डिसेंबरच्या रात्री दरम्यान घडल्याची फिर्याद १५ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली .
अकोला-अमरावती या राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक चालक उदयराज सिंग त्रिभवण सिंग राजपूत वय ६५ रा. गुरुनानक फार्मसी कॉलेजजवळ ,कशिनगर कामठी रोड नागपूर हे ट्रक क्रमांक एम एच ४०सी एम८०५० या वाहनाने उड्डाण पुलावरून जात असता मागून भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून बोलेरो क्रमांक एम एच १९ सी वाय ८६७७ या वाहनाच्या चालकाने मागून ट्रकला जबर धडक दिल्याने बोलेरो गाडीने असलेला पुंडलीक फतरू भोई हा सदरच्या अपघातात जखमी झाला .
ट्रक चालकाच्या फिर्यादी वरुन बोलेरो चालकाच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात २८१ ,१२५(ए) बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पवार करीत आहे.