प्रतिनिधी : पवन पाटणकर
Amaravati : दि. 15 डिसेंबर रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन ) अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निळी सलामी दिली....
परभणी मध्ये शांततेत रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या संविधान रक्षक शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक करून अमानुषपणे मारहाण मारहाण करून त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला.
निष्पाप भीम सैनिकाचा परभणी पोलिसांच्या कष्टडीमध्ये मृत्यू झाल्यामुळे या घटनेचा भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेतर्फे निषेध करण्यात आला यावेळेस पॅंथर कार्यकर्त्यांनी शपथ घेतली की भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. आणि संविधानाच्या संरक्षणासाठी इथला पॅंथर आपल्या प्राणाची ही पर्वा करणार नाही. संविधानाची विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात बंड केल्याशिवाय पॅंथर शांत बसणार नाही. ही शपथ घेतली. नंतर "भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे" अशा घोषणा देण्यात आल्या. पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देऊन दोन मिनिटाचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळेस भारतीय दलित पॅंथर चे नेते लक्ष्मण मेश्राम, प्रवीण पाटील जिल्हाध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 / जिल्हाध्यक्ष सतीश प्रधान, पॅंथर प्रकाश डोंगरे, पॅंथर मनोज धुळेकर, त्यानंतर अजय रामटेके, केशव गायकवाड, प्रदीप गजभिये, नागेश पाटील, धर्मा बागडे, पियुष पाटील, शिवदास गायकवाड, त्यानंतर रवी शेंडे व इतर सर्व पॅंथर कार्यकर्ते उपस्थित होते.