माहेरावरून १० लाख रुपये आणण्यासाठी तगादा ; पती , सासू , सासऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
मूर्तिजापूर - तालुक्यातील जामठी बुद्रुक हे माहेर असलेली तसेच ह.मु. नंदा पंजाब तायडे तिच्या आईसोबत राणा लेआऊट एमआयडीसी मूर्तिजापूर येथील रहिवासी ३२ वर्षीय महिलेला सासर दर्यापूर येथील पती , सासू सासरे यांनी लग्नात न दिलेला हुंडा १० लाख रुपये माहेरावरून आणण्यासाठी मारहाणकरून मानसीक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी पती ,सासू सासरे यांच्या विरोधात मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मूर्तिजापूरातील राणा लेआऊट एमआयडीसी परिसरातील रहिवासी नंदा पंजाब तायडे यांची मुलगी ममता सुनील गावंडे वय ३२ ही १३ मे २०१२ मध्ये लग्नानंतर दर्यापूर सासर असल्याठिकाणी राहत होती . तिचा पती सुनील दयाराम गावंडे वय ३७ हा सैन्यदलात नोकरीला असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी राहत असे म्हणून ममता ही सासू सासरे यांच्याकडे किंवा पतीजवळ राहत असे यांच्यासोबत नांदत असतांना पीडिता ममताला तीचे सासुसासरे लग्नात हुंडा कमी दिल्याचे टोमणे मारत माहेरावरून १० लाख रुपये आणण्यासाठी छळ करीत असे , ही बाब नवऱ्याला सांगितली असता त्याने सुध्दा शिवीगाळ करीत मारहाण करुन हात फ्रॅक्चर केला .अखेर ममताने सदरची हकीकत माहेरी आईला सांगून या घटनेतील आरोपी पती सुनील दयाराम गावंडे वय ३७ , सासरे दयाराम श्रावण गावंडे वय ५९ , सासू संगीता दयाराम गावंडे वय ५२ , या तीन जणांनी संगनमत करुन ममताला पैशाची मागणी करून मारहाण करीत मानसीक व शारीरिक छळ करून शिवीगाळ केल्याबाबतची फिर्याद शहर पोलीस स्टेशनला दिल्यावरून सासरकडील तीन आरोपी विरुद्ध ८५, ३५२,३५१(२)बीएनएस नुसार
गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहे .