निवडणूक यंत्रणा सज्ज ; पत्रपरिषदेत मांडला निवडणूक कार्यक्रमचा लेखाजोखा
अपवाद आढळल्यास तीन निवडणूक निरिक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन
मतदार जागृतीचे कार्य जोमाने ; दोन दिवस निवडणूक कर्मचारऱ्यांचे प्रशिक्षण
मूर्तिजापूर - विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, १ हजार ५६० केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचा दुसरा प्रशिक्षण वर्ग उद्या व परवा घेण्यात येणार आहे आणि यावेळी ७०% पेक्षा अधिक मतदान होईल, असा विश्वास उप विभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ते म्हणाले, या निवडणूकीसाठी १ लाख ५८ हाजार ९१५ पुरूष, १ लाख ५१ हजार ६११ महिला व ५ तृतीयपंथी असे एकूण ३ लाख १० हजार ५३१ मतदार ३९० मतदन केंद्रांवय मतदान करतील. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ३९० मतदान केंद्राध्यक्ष वा १ हजारा १७० मतदान अधिकारी अशी १ हजार ५६० अधिकाऱ्यांची चमू तैनात आहे. १०% पथके राखीव आहेत. त्यांचा दुसरा प्रशिक्षण वर्ग शुक्रवारी व शनिवारी येथील राधामंगलम सभागृह व व्यंकटेश बालाजी कॉन्व्हेंट मध्ये घेण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवारी येथील शासकीय धान्य गोदाम क्रमांक ५ मध्ये सकाळी ९ वाजता मतदान साहित्य वितरीत करण्यात येईला व सर्व मतदान पथके त्यांच्या नियोजित मतदान केंद्रांवर रवाना होतील.
दरम्यान रविवारी १० तारखेला सकाळी १० वाजता मतदान यंत्रांची सरमिसळ निवडणूक निरीक्षक, उमेदवार व त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीत होईल व त्यानंतर लगेच मतदान यंत्र तयार करण्याचे काम सुरू होऊन ते मंगळवार पर्यांत पूर्णत्वास जाईल. शिवाय ८५ पेक्षा अधिक वयाच्या दीव्यांग, मात्र ज्यांनी तसे अर्ज सादर केले आहेत अशा मतदारांचे गृह मतदान करवून घेतल्या जाईल. असे ४४४ अर्ज सादर झाले आहेत. त्यांचे मतदान १४,१५ व १६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी जाऊन करवून घेण्यासाठी १७ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पत्रपरिषदेत नायब तहसीलदार रवि राऊत, उमेश बनसोड व महेश नागोलकर उपस्थित होते.
या मतदार संघातील कामकाजावय नियंत्राण ठेवण्याकरिता सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून श्री यशपाल (भाप्रसे), खर्च निवाडणूक निरिक्षक म्हणून निशांत के (भामसे) व पोलीस निवडणूक निरिक्षक म्हणून श्री. अजितसिंह (भापोसे) यांची निनियुक्ती करण्यात आली आहे.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृतीचे काम सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या रॕली, वक्तृत्व, रांगाळी, निबंध आदी स्पर्धा, गर्दीच्या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पथनाट्ये असे उपक्रम राबविल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीत ५० % पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांच्या हद्दीतील मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यात येत आहे. यावेळी निश्चितपणे मतदानाची टक्केवारी ७० टक्याच्या वर जाईल असा आत्मविश्वास मूर्तिजापूर विधानसभा ३२ चे निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी व्यक्त केला.