मूर्तिजापुरात रविवार पासून श्री विठ्ठल कथा सादर करतील साध्वी अर्पिता मानस भारती

 



मूर्तिजापुरात रविवार पासून श्री विठ्ठल कथा सादर करतील साध्वी अर्पिता मानस भारती






 मूर्तिजापूर - कार्तिक मासाच्या पावन पर्वावर पाच दिवसीय श्री विठ्ठल कथा आयोजन येथील परदेसी पुरा पोळा चौकातील सोपीनाथ काकड आरती मंडळाच्या वतिने पोळा चौकात रविवार (ता.१०) ते गुरूवार (ता.१४) दरम्यान करण्यात आले असून नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील तिनखेड्याच्या वनदेवि साधिका आश्रमाच्या साध्वी अर्पिता मानस भारती कथा प्रवक्ता असतील. त्यांना गायन व अॉर्गन वर सुधीर हिवराळे, पॕड वरा सागर इंगळे, तबल्यावर पवन राजेश झाँकी साठी विजय उईके साथ संगत करतील.

       रविवारी (ता.१०) कलश स्थापना होईल. दररोज सकाळी ५ वाजता काकड आरती, दुपारी १ वाजता विठ्ठल कथा, संध्याकाळी ६.३० वाजता भवानी नगरातील माऊली महिला भजन मंडळ हरीपाठ सादर करतील. शुक्रवारी (ता.१५) सकाळी ८ वाजता पालखी मिरवणूक निघेल. ११ वाजता हभप वहिले यांचे काल्याचे किर्तन होईल. दुपारी १२ वाजता महाप्रसादाने कथा समारोप होईल. भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सोपीनाथ काकड आरती मंडळाच्या वतिने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post