वैविध्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा क्रांती सन्मान पुरस्कार देऊन गौरव !

 


           स्थानिक प्रतिनिधी /गाव सहेली टीम 

अमरावती,धारणी : "चलो जलाए दीप वहाँ, जहाँ अभी भी अंधेरा है। आईए इस साल की दिवाली बेघरों के साथ मनाए" या म्हणीला साक्षात स्वरूपात अंगिकृत करून क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन चा पुढाकार अनेक विषयावर विविध व्यक्ती सामाजिक भान जोपासून काम करतांना आपल्याला नेहमीच दिसतात. अश्या सामाजिक व्यक्तींची साधी दखल ही कुणाला घ्यावीशी वाटत नाही. हे समाजाचे वास्तव आहे अशा परिस्थितीत उपक्रमशील व्यक्तींची आणि त्यांच्या कार्याची समाजाने दखल घ्यावी याकरिता पुढाकार घेऊन क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन आणि संघर्ष बहुउदेशीय संस्था नवसारी अमरावती चे वतीने वैविध्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिवंगत सुदामकाका देशमुख, दिवंगत विनायकराव धर्माळे, दिवंगत संजय श्रीधरराव कुकडे स्मुर्ती क्रांती सन्मान पुरस्कार ६ नोव्हेंबर २०२४ रोजी अमरावती बडनेरा येथील आधार बेघर निवारा केंद्र येथे एका विशेष कार्यक्रमात हा क्रांती सन्मान पुरस्कार वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. राजीव बसवनाथे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ. शीतल पाटील राज्यसमन्वयक क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, अॅड. एम. कविता नागपूर, दरम्यान श्री. विजय धमाले, श्री. संदीप यादव, श्री. पंकज वैद्य, कु. ज्योती राठोड, सौ. रेणुका कापूसकर, सौ. माला दळवी यांना क्रांती सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच महिलांसाठी कार्य करणाऱ्या कृतिशील महिला कल्पना हरणे, प्रीती वाकेकर, उमा इंगोले, कुंदा मेश्राम, सुषमा शेटे, छाया भटकर, वंदना पवार, पूजा दिहाडे, किरण दुपारे, मोनाली राठोड, रुपाली हजारे, नंदा कांबळे, योगिता वडुरकर, प्राजक्ता बोबडे, सोनल बदरके, शिरीन खान, वर्षा पकडे, पूनम व्यास आणि बेघर साठी कार्य करणारे काळजीवाहक रोहित घोंगडे, विलास थोरात, किशोर गडलिंग, सदानंद ठाकरे आणि दिव्यांग गटाची निर्मिती करणारे दिव्यांग शहाबाज खान - प्रहार दिव्यांग गट (मूकबधिर आणि अरुण वानखडे, रवी मोरे, विलास थोरात, प्रफुल ठाकरे यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी राजीव बसवनाथे, शितल पाटील, अॅड. एम. कविता, हरिश चरपे, भूषण बाळे, हेमंत टाले, प्रफुल ठाकरे, हर्षा सगणे यांची उपस्थिती होती.

दरम्यान बेघरासाठी काही आवश्यक साहित्याचे आणि दिवाळी फराळ चे वाटप क्रांती नवनिर्मिती संघटन चे वतीने करण्यात आले. यशस्वी आयोजन विवेक वाडेकर, धर्मेंद्र भांडारकर, दिलीप लाडे, दिगंबर मेश्राम, आशिष देशमुख यांनी केले. या अभिनव उपक्रमाचे अमरावती पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post