महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस व कर्मचा-यांचे खंबीर नेतृत्व डाॅ.आर.बी.सिंह यांचे दुःखद निधन

 


कल्याण(गुरुनाथ तिरपणकर)अखिल भारतीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष व धडाडीचे नेतृत्व तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांचे आराध्य दैवत,भाग्यविधाते पितृतुल्य डाॅ.आर.बी.सिंह यांचे आजारपणामुळे नुकतेच फोर्टीज हाॅस्पिटल कल्याण येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले,या धक्कादायक बातमी मुळे शिक्षकेतर कर्मचारी परिवाराचा आधार स्तंभ हरपला या भावनेने सर्वत्र शोककळा पसरली होती.शिक्षकेतर कर्मचारी परिवार परिवारासाठी दुर्दैवी व दुःखद बातमी,काळा दिवस व मनाला चटका लावणारी बातमी होती.

    

       कै.डाॅ.आर.बी.सिंह यांनी राज्यव्यापी व देशव्यापी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी अनेक वर्षे त्यांच्या न्याय्य व रास्त मागण्यांसाठी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संप,मोर्चे,साखळी उपोषणे,धरणे,आमरण उपोषणे रास्ता रोको आणि जेल भरो या सारखी आंदोलने राबवून व तसेच वेळोवेळी शासनाशी चर्चा घडवून शिक्षकेतर कर्मचा-यांना हक्काचा न्याय मिळवून दिलेला आहे.त्यांचे खंबीर व धडाडीच्या नेतृत्वा पासून शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पोरका झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.डाॅ.आर.बी.सिंह यांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

       त्यांच्या धडाडीच्या व खंबीर नेतृत्वास त्रिवार सलाम!डाॅ.आर.बी.सिंह यांच्या पवित्र पार्थिवावर कल्याण पश्चिम येथील प्रेम आटो जवळ असलेल्या स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी शिक्षकेतर कर्मचारी परिवार,मित्र परिवार,आप्तेष्ट,नातेवाईक मंडळी व अन्य स्नेह इत्यादी उपस्थितांनी दुःखद नयनांनी भावपूर्ण व आदरपुर्वक श्रध्दांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास शांती व सदगती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करुन अखेरचा निरोप दिला.

Post a Comment

Previous Post Next Post