मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात कुणात चुरशीची लढत होणार...!

 



तिरंगी नव्हे तर चक्क पंचरंगी लढत होणार असल्याच्या चर्चांना उधाण...!




मूर्तिजापूर - विधानसभा मतदार संघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच विविध राजकीय पक्षानी आपआपले उमेदवार जाहीर करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर रोजी लढतीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी त्या आधीच कोणात चुरशीची लढत होणार असल्याच्या चर्चा मतदारांसह राजकीय विश्लेषकात रंगताना दिसत आहेत.

          निवडणूक प्रक्रियेतील एक भाग म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अर्ज मागे घेण्याची ता. ४ नोव्हेंबर रोजी लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी त्या आधीच कोणात चुरशीची लढत होणार असल्याच्या चर्चा गावात- चौकात रंगत असल्याचे दिसून येत आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसुचित जाती साठी राखीव असून तिन टर्म म्हणजेच गेली पंधरा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे हरिश पिंपळे हे आमदार म्हणून निवडून येण्यास यशस्वी झाले मात्र यावेळी निवडणूक हरिश पिंपळे यांच्यासाठी मागील निवडणूकीप्रमाणे सोपी नसल्याचे बोलल्या जात आहे. तरी सुद्धा हरिश पिंपळे हे चुरशीच्या लढतीत प्रामुख्याने समावेश असल्याचा दावा मतदारांसह राजकिय विश्लेषकांनी केला आहे.याच बरोबर प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (श.प.) उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांची मतदार संघात जमिनीवर चांगली पकड असून असंख्य मतदारांच्या मनात घर करून आहे आणि त्यांच्या मुखातून डोंगरदिवे यांच्या नावाचा निवडणूकीच्या संबंधाने आवर्जून उल्लेख केला जातो आहे. यांची मतदार संघात जमिनीवर चांगली पकड असून असंख्य मतदारांच्या मनात घर करून आहे आणि त्यांच्या मुखातून डोंगरदिवे यांच्या नावाचा निवडणूकीच्या संबंधाने आवर्जून उल्लेख केला जातो आहे. 

    त्यामुळे महायुती घटक पक्ष भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हरिश पिंपळे व महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे( श.प. ) उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.विधानसभा मतदार संघात विविध नऊ पक्षांच्या उमेदवारांसह २२ अपक्ष रिंगणात आहेत. 

     अशातच एका नामांकीत पक्षाच्या उमेदवाराच्या जाती बद्दल मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून त्यांच्या वागण्यात बोलण्यात अहंकारामुळे व भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोबतच्या सेल्फी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने मतदार राजा दुरावत असल्याचे बोलल्या जात आहे मात्र एका विशिष्ट समाजाच्या भरोश्यावर ऐन निवडणूक प्रक्रियेच्या काही महिन्यापूर्वीच मतदारसंघात आपल्या कार्याचा गौरव उदवणाऱ्या व निवडणूक रिंगणात उतरून आपल्या राजकीय पोळ्या शेकाणाऱ्यांना मतदार राजा परतीचा रस्ता दाखविल्या शिवाय राहणार नाही असा निश्चय केला असल्याचे मतदार संघात चर्चेला फार मोठ्या प्रमाणात वाव फुटला आहे. यासह एमआयएमचे सम्राट सुरवाडे व प्रहारचे रवि राठी यांची उमेदवारी सुद्धा निर्णायक ठरणार.



Tags :  #भारत #BJP #Maharashtra #VBA #महाविकास_आघाडी #mns #NCP #शरदचंद्रपवार #राजठाकरे #शिवसेना #mim #महाराष्ट्रपोलीस  #उध्दवठाकरे #एकनाथशिंदे #network #अजितपवार #देवेंद्रफडणवीस #social_media #संभाजीब्रिगेड #राष्ट्रवादी #काँग्रेस #बसपा #वंचित #aap #महायुती  #बहुजन_मुक्ती_पार्टी #भाजपा #Congress #प्रहार #आम_आदमी_पार्टी  #राजकीय #वंचित_बहुजन _आघाडी #prahar #बातमीराजकीय #अकोला #eknathsinde #मूर्तीजापूर #Marathibatmi #सोशलमीडिया #विधानसभा_निवडणुक_2024 #एमआयएम #murtizapurnews #akolanews #India  #विधानसभानिवडणुक #GavakadachiBatmi #गावाकडचीबातमी #गावाकडचा_शेतकरी #गावाकडचे_नागरिक #विद्यार्थी #शिक्षण #आरोग्य #क्रीडा #letest_news #news 

Post a Comment

Previous Post Next Post