जिमखाना माॅर्निंग वाॅक आणि योगा ग्रुप आयोजित दीपावली संध्याकाळ मोठ्या उत्साहात साजरी

 





डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे,दोपोत्सव अर्थात अंधार भेदून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा संदेश देणारा सण.याच दिवाळी आणि नरक चतुर्दशीचे औचित्य साधून जिमखाना माॅर्निंग वाॅक आणि योगा ग्रुपने डोंबिवली जिमखाना बस स्टॅन्ड वर दीपावली संध्याकाळ मोठ्या उत्साहात साजरी केली. जेष्ठ समाजसेवक श्री.अरविंद सुर्वे यांच्या संकल्पनेतून रांगोळी,फटाक्यांची आतषबाजी,अल्पोपहार याचे नियोजन केले होते.प्रदीप पाटील,देसाई साहेब,रुपेश सोमण,सिध्दापा भोरकडे,अरविंद सुर्वे,आशाराम अतकरे,आणि केसरीया यांनी फराळाची व्यवस्था केली.श्री.भोरखडे यांनी दीपावली संदर्भात महत्वाची माहिती दिली.श्रीमती कुमुद आहिरे,रेखा खोत,प्रिया चव्हाण,आणि सुप्रिया पाटकर यांनी फराळ वाटपासाठी मदत केली.श्री.विनोद कोरे यांनी बस स्टॅन्ड वर सुरेख रांगोळी काढली.सर्व सभासदांनी मिळून फटाक्यांची आतषबाजी केली.याप्रसंगी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती.श्री.अरविंद सुर्वे यांनी सगळ्यांना भेटवस्तू देऊन अभिनंदन केले.शेवटी सर्व कार्यक्म सभासदांनी मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा केला आणि एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post