सम्राट सुरवाडे यांनी गोरगरीब मुलांचा आनंद केला द्विगुणीत..
मूर्तिजापूर - येथील घरकुल परिसरात राहणाऱ्या गोर गरीब मुलांसोबत एक दिवस घालवून सम्राट सुरवाडे यांनी सपत्नीक त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे दिवाळी निमित्य त्यांच्यासाठी गोड-धोड व फटाके देऊन मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावलंय.
एमआयएमआयएमचे उमेदवार सम्राट सुरवाडे व त्यांच्या परिवाराने दिवाळी निमित्य धन्या धांडग्यांना भेटण्याऐवजी मूर्तिजापूर शहरातील व काही ग्रामीण विभागातील गावात जाऊन गोर- गरीब मुलांसोबत एक दिवस घालून त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. या गरीब मुलांना गोड -धोड व फटाके वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावलंय यामुळे सम्राट सुरवाडे यांच्या बाबत मोठी आपुलकीची भावना नागरिकांमध्ये चर्चेस आली आहे.
"मी एक वाचमन चा मुलगा असून गरिबी काय असते ते मी अगदी जवळून पहिली आहे. गरीबीचे चटके सहन करत आज या मुलांकडे पाहिल्यावर मला माझे बाल पनीचे दिवस आठवतात, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराजांच्या संदेशा प्रमाणे देव इतरत्र कुठेही नसून तो माणसात आहे तर या जगाच्या पाठीवर मी कुठलीही जात, पंथ भेद मानत नसून केवळ माणुसकी जाणतो. असे यावेळी सम्राट सुरवाडे बोलत होते.