आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून झाला प्रवेश
धामणगाव प्रतिनिधी अजय डाखोरे
धामणगाव रेल्वे -- धामणगाव रेल्वे तालुक्यात बोरगाव थंडी येथील पन्नास हुन अधिक काँग्रेस कार्यकर्ते दिनांक 9 ऑक्टोबर 2024 ला रोजी भारतीय जनता पार्टी मध्ये खुलेआम प्रवेश केला.
धामणगाव मतदार संघाचे आमदार तडफदार नेते प्रताप अडसड यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास दर्शवीत व त्यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते प्रवेश केला योगेश गाढवे दीपक बोरगे डोंगरे ,कुंभारे शुभम संजय दबले, खोपे यादव तायडे ,संतोष डोंगरे, वानखडे गोविंद उर्के सांगणे दाबले वानखडे यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपस्थित तालुका अध्यक्ष म्हणून डहाके, पवन पडोळे अजय धोंडे अशोक तायवाडे ,स्वप्निल रोंगे ,स्वप्निल धांदे ,, लोहियाजी अशा अनेक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते..